वर्षभरात पाऊस कोणत्या तारखेला. वाचा
रोहिणी गुरुवार दि. २५ मे रोजी रात्री ८ वाजून ५७ मिनिटांनी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करील. वाहन उंदीर आहे. या नक्षत्रात उन्हाळा वाढेल. आकाश अभ्राच्छादित राहील.
मृग – गुरुवार दि. ८ जून रोजी सायं. ६ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करील. वाहन हत्ती आहे. या
नक्षत्रकाळात दक्षिण भारतात पावसाला प्रारंभ होईल. दि. ८, ११, १७, १८, १९ व २१ जून रोजी पावसास अनुकूलता
राहील.
आर्द्रा – गुरुवार दि. २२ जून रोजी सायं. ५ वाजून ४७ मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करील. वाहन मेंढा आहे.
या नक्षत्र काळात सर्वत्र चांगला पाऊस पडेल. दि. २२, २३, २४, २५, २६, २७, ३० जून, १, २, ३, ५ जुलै रोजी
पावसास अनुकूलता राहील.
पुनर्वसू (तरणा पाऊस ) – गुरुवार दि. ६ जुलै रोजी सायं. ५ वाजून २५ मिनिटांनी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करील.
वाहन गाढव आहे. या नक्षत्रकाळात अनियमित पाऊस पडेल. दि. ६, ८, ९, ११, १३, १५, १६, १७, १८, जुलै रोजी
पावसास अनुकूलता राहील.
–
पुष्य (म्हातारा पाऊस) – गुरुवार दि. २० जुलै रोजी सायं. ४ वाजून ५४ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करील.
वाहन बेडूक आहे. या नक्षत्र काळात काही ठिकाणी जास्त पाऊस पडेल. दि. २०, २१, २२, २३, २५, २७, २९, ३०,
३१ जुलै, १, २, ऑगस्ट रोजी पर्जन्यवृष्टीस अनुकूलता राहील.
आश्लेषा (आसळकाचा पाऊस)
गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करील. वाहन म्हैस आहे. या नक्षत्र काळात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दि. ३, ५, ६, ८, १०, १२, १३, १५, १६ ऑगस्ट रोजी पर्जन्यवृष्टीस अनुकूलता राहील.
–
मघा (सासूंचा पाऊस)
गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य मघा नक्षत्रात ३१ प्रवेश करील. वाहन घोडा आहे. या नक्षत्र काळात शेतीस उपयुक्त पाऊस पडेल. दि. १७, १९, २०, २२, २५, २७, ३० ऑगस्ट रोजी पर्जन्यवृष्टीस अनुकूलता राहील.
पूर्वा फाल्गुनी (सुनांचा पाऊस)
गुरुवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करील. वाहन मोर आहे. या नक्षत्र काळात चांगला पाऊस पडेल. काही ठिकाणी ओढ लावेल. दि. ३१ ऑगस्ट, १, २, ३, ५, ७, ८, ९, १०, १२ सप्टेंबर रोजी पावसास अनुकूलता राहील.
उत्तरा फाल्गुनी (रब्बीचा पाऊस)
बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी उत्तररात्री ३ वाजून २४ मिनिटांनी सूर्य उत्तरा
फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करील. वाहन हत्ती आहे. या नक्षत्र काळात काही ठिकाणी जास्त पाऊस पडेल. शेतीस नुकसान
होईल. दि. १३, १५, १६, १८, २२, २६ सप्टेंबर रोजी पावसास अनुकूलता राहील.
हस्त (हत्तीचा पाऊस )
बुधवार दि. २७ सप्टेंबर रोजी सायं. ६ वाजून ५४ मिनिटांनी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश
करील. वाहन बेडूक आहे. या नक्षत्र काळात काही ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. २७, २९, ३०,
सप्टेंबर, १, ३, ५, ८, १० ऑक्टोबर रोजी पावसास अनुकूलता राहील.
चित्रा
बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करील. वाहन
| उंदीर आहे. या नक्षत्र काळात अल्प पर्जन्यवृष्टी होईल. दि. ११, १४, १५, १७, २० ऑक्टोबर रोजी पावसास अनुकूलता
राहील.
स्वाती
मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सायं. ६ वाजून २५ मिनिटांनी सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करील. वाहन
घोडा आहे. या नक्षत्रकाळात अल्पवृष्टी होईल.
नक्षत्रवाहनांवरून पावसाचा अंदाज बांधण्याची पद्धत फार प्राचीन आहे. तरी शेतकरी बंधूंनी आकाशवाणी,
दूरदर्शनवरील वेधशाळेने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाकडे जास्त लक्ष द्यावे. त्याप्रमाणे शेतीकामाचे
वेळापत्रक तयार करावे.