ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसला लागली आग


चाकण : बसला आग लागल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. बसने अनेक जण प्रवास करत असतात, मात्र प्रवाशांच्या जास्त तिकीटाचे दर आकारुन प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
पुणे नाशिक महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले तर वाहतूकही विस्कळीत झाली.

नाशिक वरुन पुण्याला जाताना चाकणमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौकात घटना घडल्याने परिसरात गर्दी जमा झाली. शिवशाही बसच्या टायरला आग लागून बसने पेट घेतला. चाकण नगरपरिषदेच्या आग्णिशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालं असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दुसरीकडे आज सकाळी सोलापुरात एसटी महामंडळाच्या गाडीचा डायर फुटला, दैव बलवत्तर म्हणून सुदैवानं दुर्घटना टळली. सोलापूर बार्शी मार्गावर राज्य परिवहन बेफिकिरी कारभार समोर आला आहे. बार्शी वरून सोलापूर कडे निघालेल्या विना थांबा एसटी बसचा टायर चालू एसटीमध्ये फुटल्याची घटना घडली आहे. एसटी वाहक कालिदास गवळी यांच्या प्रसंगावधानामुळे एसटीच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मोठा अनर्थ टळला. एसटी बस मध्ये 15 ते 20 प्रवासी प्रवास करत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button