नागरिकांशी असंसदीय भाषा वापरणाऱ्या मुजोर खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांना निलंबित करा, अन्यथा संघटनेचा बेमुदत सत्याग्रह आंदोलनाचा इशारा
पुणे पोलिस कमिशनर बंडगार्डन पोलिसांकडे, संजय बामणेवर एफआयआर दाखल करण्यासाठी संघटनेची तक्रार दाखल करा.
संघटनेचे तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश, संघटना.
नागरिकांशी असंसदीय भाषा वापरणाऱ्या मुजोर खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांना निलंबित करा, अन्यथा संघटनेचा बेमुदत सत्याग्रह आंदोलनाचा इशारा.
शेतकरी संघटनेचे लेखी तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी यांचे तात्काळ चौकशीचे आदेश.,
मुजोर गब्बरसिंग खनिकर्म अधिकारी संजय बामनेची एसीबीकडे तक्रार दाखल.
तात्काळ निलंबन कारवाई करा अन्यथा संबंधितांविरुद्ध सक्षम न्यायालयात दाद मागू. शेतकरी संघटनेचा इशारा.
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन करत शहर व जिल्ह्याची चाळण करणाऱ्या मुजोर बिल्डर, गौण खनिज उत्खनन करणारे बिल्डर डॉन गब्बर सिंग यांनी कोट्यावधी रुपयाचे गौण खनिज, काला सोना, संजय बामणे चे कृपेने कोट्यवधी रुपयांची सरकारी तिजोरीवर दरोडा घालणाऱ्या संबंधितांवर करोडो रुपयाचे दंड आकारण्यात आलेला आहे. बाबत केलेल्या तक्रारी अर्जावर बामणे कोणतीच कारवाई का करत नाहीत.? गौण खनिज उत्खनना मधील काला सोना मलिदा खाणारा गब्बर सिंग कोण,?
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागाकडून दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर केला जात आहे. बेकायदेशीर उत्खनन काला सोना चोरी करण्याच्या तक्रारीनंतरही कोणतीही चौकशी नाही. इळीमिरी गुपचिळी कार्यक्रम सुरू असल्याचे संघटनेच्या लक्षात आलेले आहे. म्हणून संघटनेंने माननीय मुख्यमंत्री खनिकर्म मंत्री, मुख्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार केली असता त्यांचे कडून गंभीर दखल घेत पुणे जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते. तहसीलदार यांनी चार ते पाच एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पत्र व्यवहार केलेला आहे तसेच बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन पुरावे देत केलेल्या तक्रार अर्जा नंतर, मुंढवा तलाठी येरवडा मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, पुणे शहर मावळ इंदापूर हडपसर येरवडा यांचे कडून केलेले पंचनामे तसेच तहसीलदार यांचे कडून काय चार ते पाच ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्रव्यवहार देखील केलेला आहे परंतु त्याबाबत पुढील कोणतीही उचित कारवाई न झाल्याने, संघटनेने केलेल्या पत्रव्यवहाराच्या संदर्भामध्ये उलट टपली काहीही पत्रव्यवहार न झाल्याने सदर बाबत काय झाले, मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना देखील चौकशी होत नाही बाबत विचारना करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर संघटनेच्या मुखपत्राचे उपसंपादक, यांनी एक जून रोजी जिल्हा खनिखर्मा अधिकारी संजय बामणे यांच्या कार्यालयात जाऊन समक्ष भेटून विचारणा केली असता बामणे हे कर्तव्यात कसूर, दप्त दिरंगाई करत आहेत बाबतचा जाब विचारल्यानंतर संजय बामणे यांनी अ,संसदीय भाषा वापरत पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले आहे सदर बाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांच्याकडे समक्ष तक्रार केली असता त्यांनी लिखित तक्रार करण्याची करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुजोर कर्तव्यात कसूर व दप्तर दिरंगाई करणारा गब्बर सिंग खनीकर्म अधिकारी संजय बामणे यांचे विरुद्ध दिनांक 5 जून रोजी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख साहेब यांच्याकडे बामणे यांना तत्काळ निलंबित करून एफ आय आर दाखल करण्यात यावेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच एसीबी मार्फत ही चौकशी करावी असा लेखी तक्रार अर्ज पुराव्यानिशी मागणी केली आहे.
नागरिकांशी गैरवर्तन, अ,संसदीय भाषा ,दप्तर दिरंगाई , कर्तव्यात कसूर करणारा मुजोर अधिकारी संजय बामणे याचे विरुद्ध अनेक सामान्य नागरिकांच्या तक्रारी देखील आहेत, त्यांचे विरुद्ध, सर्वसामान्य नागरिकांवर केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेचे युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर यांनी जिल्हा खनि कर्म अधिकारी संजय बामणे यांच्या कार्यालयात समक्ष जाऊन संघटनेने बेकायदेशीर गौन खनिज उत्खनन बाबतीत केलेल्या तक्रारीच्या संदर्भात काय कार्यवाही केली, बाबत उलट टपली पत्रव्यवहाराची मागणी केली होती, मात्र मुजोर खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांनी भांडवलकर यांच्याशी गैरवर्तन करत असंसदीय भाषा वापरून दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणाने संघटनेने संजय बामणे यांना निलंबित करून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि एंटी करप्शन ब्युरो मार्फत त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा अशी लेखी मागणी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी दिनांक 5 जून रोजी पुणे जिल्हा कलेक्टर डॉ राजेश देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पाटील साहेब तसेच लातूर प्रतिबंधक अधीक्षक सोनवणे साहेब यांचेकडे लेखी निवेदनाने केली आहे, त्याबाबतच्या प्रती मुख्यमंत्री व खणीकर्म खनिजे मंत्री यांचेकडे दिले आहेत, यावेळी संघटनेचे लेखी म्हणणे व निवेदन उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांनी स्वीकारले आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी पत्रकारांना दिली, तसेच पुणे शहर बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील साहेब यांनीही तत्काळ एफ आय आर दाखल करण्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सोनवणे साहेब यांची भेट घेऊन तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक यांनी पत्रकारांना दिली, यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा शहर युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, दिपक फाळके अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, संघटनेचे केशवनगर, मुंढवा, पुणे शहर, मावळ, इंदापूर येथील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यानंतर झालेल्या पत्रकारांशी संवादा दरम्यान वरील माहिती विठ्ठल पवार राजे यांनी पत्रकारांना दिली.
विठ्ठल पवार राजे
अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक
शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य.