देहूरोड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साही वातावरणात संपन्न
देहूरोड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साही वातावरणात संपन्न,
मिरवणूकीला फाटा देऊन अन्नदान व अनाथ आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ,
देहूरोड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने , देहूरोड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती रविवार दि. ४ / ६ / २०२३ रोजी दुपारी १२ – ३० वाजता एम .बी. कॅंम्प शकूरमामू चौक देहूरोड येथे उत्साही वातावरणात व मिरवणूकीला फाटा देत अनाथ आश्रम, वृध्दाश्रम मुस्लिम यतिम मदरसा येथे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन ,व अन्नदान करुन, आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली,
कार्यक्रमांच्या सुरुवातीला रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, प्रदेश सचिव कल्याण अडागळे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सत्तारभाई शेख, उपाध्यक्ष शकुरभाई शेख, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव स्टीवन जोसेफ, पुणे शहर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सुरज गायकवाड, लहू जोगदंड, राहूल कांबळे जिल्हा सचिव सुभाष सहजराव, हवेली तालुका अध्यक्ष, किशोर पंडागळे, धर्मपाल तंतरपाळे, अशोक चव्हाण, गणेश बनसोडे, नईम शेख, आनंद साळवे, दशरथ वाघमारे, बाबू दुधागरे ,सोनीताई जाधव , हुसेन शेख विक्की फ्रानसेस ,जलाउद्दीन शेख सतिश कवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते,
रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सत्तारभाई शेख व शकूरभाई शेख यांच्या वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सतिश केदारी यांच्या शुभहस्ते रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी डॉ. सतिश केदारी, विष्णूदादा भोसले, कल्याण अडागळे, धर्मपाल तंतरपाळे यांनी मनोगत व्यक्त केले, शकूरभाई शेख यांनी प्रास्ताविक केले , तर गणेश बनसोडे यांनी सुत्रसंचालन केले तर सत्तारभाई शेख यांनी आभार मानले,
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते शकुरभाई शेख व सत्तारभाई शेख यांनी केले होते.