ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

आगामी सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युती लढविणार


नवी दिल्ली : ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री उशिरा केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ट्विट करून माहिती दिली. ते म्हणाले, ‘कृषी, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आगामी सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युती लढवणार आम्ही ही भेट घेतल्याचे ते म्हणाले.

राज्यात आगामी सर्व निवडणुका (लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button