शारीरीक संबंध बनला खेळ, होणार पहिली चॅम्पियनशिप; स्पर्धेसाठी 16 विचित्र नियम
जगभरात अनेक वेगवेगळे खेळ अस्तित्वात आहेत. अनेक खेळाडू या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि देशाचं नाव मोठं करतात. मात्र सध्या असा एक खेळ समोर आला आहे ज्याला नुकतीच मान्यता मिळाली असून या बातमीने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.https://twitter.com/PKikos/status/1663333481840259072?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1663333481840259072%7Ctwgr%5E20271362680a7824242dcc379814474d845530fe%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
या खेळाबद्दल ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. स्वीडन युरोपियन देशाने शारीरीक संबंधांना म्हणजेच सेक्सला खेळ बनवण्याचा विचार केला आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल मात्र ही गोष्ट खरी आहे. स्वीडनने अलीकडेच एक खेळ म्हणून सेक्सची नोंदणी केली आहे.
या महिन्यात 8 जूनपासून युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी एकूण 20 देशांतील स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. अनेक आठवडे चालणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये सहभागींना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. सहभागी खेळाडूंना सामन्यासाठी तयार होण्यासाठी 45 मिनिटांचा अवधी असेल.
या चॅम्पियनशिपसाठी स्पर्धकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण 16 स्पर्धा होणार आहेत. यामध्ये सेडक्शन, ओरल सेक्स, पेनिट्रेशन, मसाज, असणार आहे. प्रत्येक गेममध्ये कोण विजेता ठरेल हे जज आणि प्रेक्षकांच्या मतांवरून ठरवले जाईल.
यादरम्यान 30 टक्के मते जज देणार तर 70 टक्के मते प्रेक्षकांची असतील. या दोघांच्या मतांच्या आधारे विजेता घोषित केला जाईल. दरम्यान, स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिक म्हणतात की सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने लोकांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य वाढेल. याशिवाय समाजात निषिद्ध मानल्या जाणार्या सेक्सबाबत लोकांच्या दृष्टिकोनही बदलेल.