ताज्या बातम्या

अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर शेतकऱ्यांकडून शेती करून आंदाेलन


अबरनाथ : अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांनी थेट राज्य महामार्गाची एक लेन बंद करत त्यावर शेती सुरू केली आहे. एमआयडीसीने ५० वर्षांपूर्वी केलेल्या भूसंपादनात एक कागदी चूक केल्याने शेतकऱ्यांची जागा ५० वर्षांपासून अक्षरशः खितपत पडली आहे.
याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याने आता थेट राज्य महामार्गाची एक लेन बंद करत त्यावर शेतकऱ्यांनी शेती सुरू केली आहे. सोबतच शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनीच आता आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी सादही या शेतकऱ्यांनी घातली आहे.

अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली – बदलापूर पाइपलाइन रोड या राज्य महामार्गासाठी वसार गावातील शेतकऱ्यांची जागा एमआयडीसीने १९७२ साली संपादित केली होती. बारवी धरणातून ठाण्याकडे जाणारी पाण्याची पाइपलाइन आणि राज्य महामार्ग बांधण्यासाठी ही जागा एमआयडीसीने ताब्यात घेतली. कागदोपत्री नोंद करताना प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जागेऐवजी रस्त्याच्या बाजूच्या जागेवर एमआयडीसीने फेरफारची नोंद केली. त्यामुळे ज्या जागेवर रस्ता आहे, ती जागा गेली आणि बाजूच्या जागेवर एमआयडीसीची नोंद असल्यामुळे त्या जागेवरही काहीच करता येत नाही, या दुहेरी कोंडीत शेतकरी अडकले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button