ताज्या बातम्यादेश-विदेश

ओडिशामध्ये 3 रेल्वे गाड्यांची टक्कर, सर्वात मोठा भीषण अपघात


चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ आधी हावडा एक्सप्रेस ही मालगाडीला धडकली. ही दुर्घटना खूप मोठी होती. त्यानंतर लगेच मागून आलेली कोरोमंडल एक्सप्रेस या दोन अपघातग्रस्त गाड्यांना धडकली. त्यामुळे घटनास्थळी मोठा हाहाकार उडाला. कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक डब्बे रुळाखाली घसरले. चार ते पाच रेल्वे डब्बे अक्षरश: पलटी झाले.

शेकडो जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी काम करत आहेत. देशभरातून वेगवेगळी पथक ओडिशाला मदतीसाठी रवाना झाले आहेत.

दुर्घटना खूप मोठी आहे. एका गाडीत 1600 प्रवाशी होते, अशी माहिती मिळत आहे. अपघात तीन रेल्वे गाड्यांचा आहे. त्यामुळे नुकसान खूप मोठं आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वात भयानक रेल्वे दुर्घटना आहे.

मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर

दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गोवा येथून ओडिशा येथे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे उद्याचा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 300 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींच्या मदतीसाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

हेल्पलाईन नंबर जारी

रेल्वेने वेगवेगळ्या स्थानकांवरून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांमध्ये, 033 26382217, खरगपूर हेल्पलाइन क्रमांक 8972073925/9332392339, बालासोर हेल्पलाइन क्रमांक – 8249591559/7978418322 आणि शालीमार हेल्पलाइन क्रमांक 9903370746 हावरा स्टेशनवरून जारी करण्यात आला आहे.

चेन्नई सेंट्रलने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत, प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बूथही उघडले जात आहेत. या क्रमांकांवर संपर्क साधला जाऊ शकतो – 044- 25330952, 044-25330953 आणि 044-25354771.

या अपघातावर शोक व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button