क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या


हैदराबाद : देशभरात चर्चेत आलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखा आणखी एक प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. याठिकाणी एका व्यक्तीने गर्लफ्रेंडची चाकू मारून हत्या केली. त्यानंतर दगड कापणाऱ्या मशीन खरेदी करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
शिर वेगळे करत ते पॉलिथीन पिशवीतून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे कचरा कुंडीत फेकले. कुठलाही पुरावा राहू नये यासाठी त्याने घर स्वच्छ करत साफसफाई केली. इतकेच नाही तर मृत युवतीच्या फोनवरून तिच्या ओळखीच्यांना मॅसेज केला जेणेकरून ती जिवंत आहे आहे असं वाटावे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली.

१७ मे रोजी सुधाकर नावाच्या सफाई कर्मचाऱ्याला कचरा डंपिग जागेवर काळ्या रंगाच्या पॉलिथीनमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. ही माहिती त्याने पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासणी केली असता हा मृतदेह येरम अनुराधा रेड्डी या महिलेचा असल्याचे कळाले. अनुराधा ५५ वर्षाची होती. तिचे ४८ वर्षीय चंद्रमोहनसोबत १५ वर्षापासून अनैतिक संबंध होते. अनुराधाच्या पतीने खूप आधीच तिला सोडून दिले. तेव्हापासून ती चंद्रमोहनच्या घरीच राहायची.

अनुराधा ही व्याजावर पैसे देण्याचे काम करायची. चंद्रमोहनने अनुराधाकडून २०१८ मध्ये ७ लाख रुपये घेतले होते. अनुराधा चंद्रमोहनकडे हे पैसे परत मागत होती. परंतु तो तिला पैसे देत नव्हता. अनुराधाकडून पैशासाठी होणारा दबाव पाहता यातून दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचा. त्यामुळे चंद्रमोहनने अनुराधाचा काटा काढण्याचे ठरवले. १२ मे रोजी या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी चंद्रमोहनने अनुराधावर चाकूने हल्ला करत तिचा जीव घेतला.

अनुराधाची हत्या करून चंद्रमोहनने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. सुरुवातीला त्याने दगड कापणारी मशीन आणली त्याने मृतदेहाचे शिर वेगळे केले. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले. शिर फ्रिजमध्ये ठेवले तर इतर मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये ठेवले. १५ मे रोजी त्याने रिक्षाच्या मदतीने कचऱ्याच्या डंपिगग्राऊंडमध्ये हे तुकडे फेकले. आरोपीने फिनाईल, डेटॉल, परफ्यूम, अगरबत्ती आणि स्प्रेचा वापर करत मृतदेहाचा वास पसरू नये याची खबरदारी घेतली. मात्र कचरा डंपिगग्राऊंड येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हे तुकडे सापडले तिथून ही संपूर्ण घटना उघडकीस आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button