ताज्या बातम्या

बारावी उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय झाले? मंडळाने काय घेतला निर्णय


बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळले. एकाच संस्थेच्या दोन कॉलेजकडे या उत्तरपत्रिका गेल्या होत्या.
या प्रकरणी मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या हस्ताक्षर बदल झालेल्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाने जारी केला आहे.

बोर्ड करणार गुन्हा दाखल

बोर्डाला 396 विद्यार्थ्यांचा उत्तरपात्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आले. यानंतर या प्रकरणी बोर्डाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हस्ताक्षर बदल प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने प्रकरणाचे सर्व धागेधोर उघड होणार आहे.

कसा दिला निकाल

बोर्डाने त्या 396 विद्यार्थ्यांचा निकाल दिला आहे. परंतु बदललेले हस्ताक्षर ग्राह्य न पकडता मूळ उत्तरपत्रिकेवरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

बारावीचा विभागवार निकाल

कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के

कुठे पाहता येईल निकाल ?

Maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

SMS द्वारे कसा पहाणार निकाल?

SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button