केसांसाठी संजीवनीचे काम करतो कांदा, जाणून घ्या 5 चमत्कारिक फायदे
पदार्थ कोणत्याही असो, कांदा त्याची चव वाढवण्याचे काम करतो. कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात भाजी किंवा कोशिंबीर म्हणून केला जातो. पण तुम्हाला कच्चा कांदा खाण्याचे फायदे माहित आहेत का?कांद्याचे जेवणातच नाही तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक फायदे आहे. कांदा प्रत्येक घरात भाजी, डाळीत आणि सलाड म्हणून वापरला जातो. कांदा हा आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना आहे. कांद्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. याशिवाय यात अँटी-एलर्जिक,अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील आहेत.
– मधुमेहावर फायदेशीर
– शरीरावरी सूज कमी होईल
– लोह कमतरता भरून काढणे
– संसर्गावर उपयुक्त
– रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त…
– हाडे मजबूत करणे
केसांसाठी संजीवनीचे काम करतो कांदा
कांद्याच्या रसामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे डोक्यातील कोंडा आणि इतर टाळू संक्रमण कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला टाळूच्या खाज सुटण्याचा त्रास होत असेल तर कांद्याचा रस जरूर लावा, आराम मिळेल.
केसांची मुळे मजबूत करण्यासाठी कांदा फायदेशीर आहे. कांद्याच्या रसात सल्फर पुरेशा प्रमाणात आढळते. जे केस निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. हे केस तुटण्यास प्रतिबंध करते, केस मजबूत बनवते. केस वाढीसाठी कांदा उपयुक्त आहे.
केस गळणे आणि तुटणे थांबते
कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, जे केस गळणे आणि तुटणे थांबवते. याव्यतिरिक्त, त्याचे प्रतिजैविक गुण टाळूवर संक्रमण टाळण्यास आणि निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ‘कांदा केसांसाठी चांगला का आहे’ याचे उत्तर देणारे काही आश्चर्यकारक तथ्य आहेत.
केस गळणे प्रतिबंधित करते
कांद्याच्या रसामध्ये सल्फरची पातळी जास्त असते. ज्यामुळे केस गळती रोखण्यात मदत होते. सल्फर कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे नवीन केसांच्या कूपांच्या विकासास प्रोत्साहन देते.
असा बनवा कांद्याचा रस
– प्रथम कांदा सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत.
– चिरलेला कांदा ब्लेंडरमध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्या.
– तयार झालेली कांद्याची पेस्ट वस्त्रगाळ करून घ्या.
– कांद्याचा रस तयार झाल्यानंतर त्याने टाळूवर व्यवस्थित मसाज करा.
– किमान 30 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.