ताज्या बातम्या

भाजप नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; प्रवेश करताच भाजपवर सडकून; म्हणाले.


आशोक निंबर्गी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला यांचा मला आनंद आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवानी यांच्या विचाराने भारावलेले होतो. पण मागील 7 वर्षांपासून पक्षात एकाधिकारशाही सुरू आहे. त्याला कटाळून मी भाजप पक्षातून बाहेर आलो, असं अशोक निंबर्गी यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना आवाहन केले की, एकदा सत्ता द्या सोलापूरचा कायापालट करतो. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. माजी महापौरांना सर्वात जास्त त्रास दिला. मात्र आज तुमची जाहीर माफी मागतो. आताची लोकशाही ही स्क्रिप्टेड लोकशाही आहे. भाजपला दोन खासदार निवडून दिले मात्र ते कधी आले आणि कधी गेले ते कळलंच नाही, असा घणाघात अशोक निंबर्गी यांनी केलाय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button