ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

“महाराष्ट्राचा कर्नाटक होऊ देणार नाही”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचा निर्धार


चंदननगर: नुकत्याच लागलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये भाजपचा दारूण झालेल्या पराभवामुळे खचून न जाता त्याचा महाराष्ट्र व लोकसभेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसून केंद्रात मोदींचे व राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार येणार, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्यक्त केले.
op पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांच्या तीन वर्ष कार्यकाळाच्या संघर्ष पर्व या पुस्तकाचे व भारतीय जनता पार्टी च्या वतीने पुणे शहरात घर चलो अभियानाचे शुभारंभ करण्यात आला.

येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये देवेंद्र फडवणीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळातील केलेल्या कोविडमध्ये केलेल्या भ्रष्टाचार यावर पुणे शहर भाजपने संघर्ष केला. प्रेताच्या टाळुवरचे लोणी महविकास आघाडीने केला. भाजपचा डीएनए संघर्षाचा आहे. स्वभाव शांत आहे. कार्यव्यस्त आहेत. वयक्तिक कधी काम घेऊन आलेच नाही. नऊ वर्षात बदलेला भारत बघितला. जगात मोदींची प्रतिमा उंचावली. अर्थव्यवस्था उभी केल्याने भारतात मंदी नाही. देश वेगाने प्रगती करत आहे. नऊ वर्षत बदलेला भारत पाहतोय. 2019 ला जनतेने निवडून दिले. पण खुर्चीकरता लालसेपोटी अभद्र युती केली. संघर्ष केला. खरी शिवसेना आपल्या सोबत आली. सरकार घळविण्यात करिता मी घरी बसायला तयार होतो. स्थगिती सरकार घालून गतिशील सरकार आणले आहे. विकासाला चालना मिळाली. 40 टक्के कर माफ केला. निर्णय चांगले घेत आहेत. कर्नाटक मध्ये अपेक्षित यश आले नाही. पण टक्केवारी बरोबर आहे. लोकसभेच्या 25 जागा कर्नाटक मध्ये जिंकेल. जया पराज्याचा भाजपला काही फरक पडत नाही. महाराष्ट्रत स्वप्न साकार होणार नाही. संघटनावर भर द्या. प्रत्येकांच्या घरी जा पहिली लढाई मनपा जींकणार, भगवा फडकविणार पुण्यात असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी योग्य मूल्यमापन करणारे देवेंद्रजी आहेत. जगदीशची काळजी करण्याची गरज नाही. प्रभावी पणे काम केले. निवडणुकांचे वर्षे आहे. पुण्याचा विकास भाजपने केला असल्याचे मत व्यक्त केले. जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री झाला नाही ही सल आहे. पण यापुढे होण्याच्या शुभेच्छा देत आहे. कार्यकर्ते तत्ववादी आहेत. भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुका जींकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केले. यावेळी पुणे शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस ओरडले बीपी वाढलं…

जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही कामे निमित्त मुंबईत भेट घेतली असता ते माझ्यावर ओरडल्यामुळे माझा बीपी वाढलं होता मात्र काही दिवसानंतर देवेंद्र फडणवीस पुण्यात आल्यावर माझ्या पाठीवर थाप मारल्याने माझं बीपी नॉर्मल झाल्याचा किस्सा जगदीश मुळीक यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button