महाराष्ट्र दिनी प्रभूवाडगाव शाळेत बालकाव्यरंग हस्तलिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनी प्रभूवाडगाव शाळेत बालकाव्यरंग हस्तलिखित काव्यसंग्रहाचे प्रकाशन
शेवगाव तालुक्यातील प्रभूवाडगाव जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला . प्रारंभी झेंडावंदनानंतर बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ शंकर गाडेकर यांच्या हस्ते ” बालकाव्यरंग ” या इयत्ता पहिली ते सातवीच्या बालकवी विद्यार्थ्यांनी लेखन केलेल्या काव्य चित्र संग्रहाचे प्रकाशन सरपंच ज्ञानदेव घोडेराव , ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ जायभाये , किशोर थोरे , देवीदास बटुळे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव बटुळे मुख्याध्यापक सखाराम सातपुते , सहशिक्षक नारायण खेडकर संदीप अभंग उध्दव व्यवहारे दत्तु फुंदे पदवीधर शिक्षक कचरू नागरे व शिक्षक कवी गवाजी बळीद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक कलाकार कवी लेखक खेळाडू वक्ता दडलेला असतो त्याच्या संवेदनशील मनाला प्रेरणा देऊन योग्य मार्गदर्शन व सराव केल्यास निश्चितच जीवनात महान व्यक्ती बनू शकतो असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे हस्तलिखित संपादन करून शिक्षक कवी गवाजी बळीद यांनी बालकवींचा अनमोल विविध विषयांवरील चित्र काव्य आठवणींचा खजिना स्तुत्य उपक्रम राबविला व त्यांना सरपंच व सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक यांनी कवी बळीद यांना केलेल्या सहकार्याबद्दल विशेष अभिनंदन केले व भविष्यातही असे प्रेरणादायी साहित्यनिर्मितीसारखे उपक्रम व्हावेत याकरिता बालमित्रांना मनोरंजक प्रश्नोत्तर रुपात प्रबोधित करून शुभेच्छा दिल्या .
आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष व सरपंच ज्ञानदेव घोडेराव यांनी शाळेतील बालकवींनी लेखन केलेल्या कविता त्यांच्या वयोगटाला अनुरूप असून काव्यक्षेत्रात आनंददायी पदार्पण हे भूषणावह असल्याचे मत व्यक्त केले . शालेय परिसर सर्व अद्या या वत सुविधांनी युक्त अशी आदर्श शाळा निर्माण करण्याचा मानस त्यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगून आपल्या भाषणातून व्यक्त केला . यावेळी अंगणवाडी ताई सिंधुताई डिघुळे आशाताई ढाकणे विद्याताई बटुळे बब्बुताई फटांगरे आदिंची विशेष उपस्थिती होती .
अध्यक्षीय निवड शिक्षक उद्धव व्यवहारे अनुमोदन नारायण खेडकर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सखाराम सातपुते यांनी केले .
प्रमुख पाहुण्यांचा परिचय संदीप अभंग यांनी करून दिला . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दत्तु फुंदे यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बळीद यांनी तर सर्व मान्यवर उपस्थित मान्यवरांचे आभार पदवीधर शिक्षक श्री कचरू नागरे यांनी मानले .
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.