लव मॅरेज केलं पण पहिलीच मुलगी झाली, तरुणीसोबत घडलं धक्कादायक
छत्रपती संभाजीनगर, : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. मात्र, या तरुणाने संबंधित प्रेयसीला सोडून देत दुसरीसोबतच विवाह केला.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानसिक तणावातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर मुलगी झाल्याने एकाने पत्नीला सोडल्याची धक्कादायक घटना घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण – प्रेमसंबंधातुन आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीस वर्षभरानंतर मुलगी होताच माहेरी सोडून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह कौटुंबिक छळाचा गुन्हा पतीसह सासरच्या लोकांच्या विरोधात नोंदविण्यात आला आहे.
आरोपींमध्ये पती अमेयकुमार नितीनचंद्र पाटील, सासरा नितीनचंद्र रामचंद्र पाटील यांच्यासह दोन महिलसांचा समावेश आहे. पीडिता आणि आरोपी अमेयकुमार पाटील या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधानंतर तिने आपला प्रियकर अमेयकुमार याच्यासोबत 24 मे 2021 रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. पण या कुटुंबाला अमेयकुमारच्या कुटुंबाने मान्यता दिली नाही आणि पीडितेला अमेयकुमारच्या कुटुंबांनी लग्नानंतर त्यांना घरात घेण्यास नकार दिला.
तसेच त्यानंतर वारंवार तिला त्रास देत, फ्लॅट खाली करण्यास सांगितले. यातच पीडितेने 16 जुन 2022 रोजी एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याची माहिती सासरच्यांना झाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा नांदवायला नेण्यास नकार दिला. शेवटी पीडितेने क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय. या घटनेमुळे, हे कसले प्रेम असा प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.