अजित पवार सीमा रेषेवर… नारायण राणे यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. तीन दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांची समजूत घालताना शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची संकेत दिले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच भाजप नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत राणेंचं मोठं विधान केले आहे. सामातूनही आज अशाच प्रकारची टीका करण्यात आली होती.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर विलाप करणा-या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते कुंपणावर? पवारांचे पाय खेचणार? अजित पवार, विलाप करणा-या नेत्यांवर सामानतून निशाणा साधण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.
सामानामधून काय टीका करण्यात आली
निवृत्तीची घोषणा करताच प्रमुख नेत्यांनी पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले… अशी घणाघाती टीका ‘सामना’तून करण्यात आली.
अजित पवारांबाबत नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
अजित पवार सीमा रेषेवर आहेत असे नारायण राणे यांनी म्हंटले आहे. अजितदादा भाजपसोबत येण्याबाबत नारायण राणेंनी हे विधान केले आहे. अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र, पवार यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीमुळे ही चर्चा शांत झाली होती. माक्ष, नारायण राणे पुन्हा एकदा ही चर्चेला उधाण आणणारे वक्त्व्य केले आहे.
कोण होणार राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेमलेल्या समितीची बैठक 5 मे रोजी होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक होईल. शरद पवार राजीनाम्यावर ठाम राहिल्यास सुप्रिया सुळे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर समितीची घोषणा करण्यात आली होती. समिती याबाबत निर्णय घेणार आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.