हडपसरमधील सराफी पेढीतून १२४ तोळ्यांचे दागिने लंपास
पुणे: हडपसर भागातील एका प्रसिद्ध सराफी पेढीतून सुमारे ८० लाख रुपये किमतीचे १२४ तोळे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सराफी पेढीतील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी सराफी पेढीतील कर्मचारी महिलेसह सागर सूर्यकांत नखाते (वय ३२, ससाणेनगर, हडपसर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार प्रताप तिवारी (वय २९, रा. हडपसर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील मगरपट्टा भागात असलेल्या चंदूकाका सराफ अँड सन्स पेढीत आरोपी महिला आणि नखाते लेखा विभागात कामाल आहेत. दालनातील सोन्याच्या वस्तू, गंठण, पाटल्या तसेच अन्य दागिने दोघांनी परस्पर वित्तीय कंपनीकडे गहाण ठेवले होते. त्यापोटी मिळालेली रक्कम त्यांनी शेअर बाजारात गुंतविली होती. सराफी पेढीतील व्यवस्थापनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.