आगीच्या धुरात गुदमरून दोन तरुणांचा झोपेतच मृत्यू
नागपुर:नागपूरच्या इमामवाडा परिसरात आगीच्या धुरात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ज्यावेळी घटना घडली तेव्हा हे दोघे तरुण झोपेत होते. त्यामुळे त्यांच्या झोपेतच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. नागपूर : नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत घराच्या खोलीत धुराचे साम्राज्य निर्माण झाले. त्यात गुदमरून दोघांचा मृत्यू झाला आहे. आकाश रजत आणि अमान तिवारी अशी मृतकांची नावे आहेत.
झोपेतच गुदमरून मृत्यू : आकाश आणि अमान हे दोघेही आनंद पब्लिक शाळेच्या शेजारी असलेल्या खोलीत राहत होते. हे दोघेही मध्य प्रदेशाचे रहिवासी असून नागपूर शहरात ते फ्लेक्स बोर्ड तयार करण्याचे काम करत होते. काल रात्रीच्या सुमारास त्यांच्या खोलीतील विजेचा बोर्डला शॉर्टसर्किटमुळे आग लागली त्यामुळे निघालेल्या धुरामुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. ज्यावेळी घटना घडली तेव्हा आकाश आणि अमान दोघेही झोपेत असल्याने त्यांना काही कळण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
नातेवाईक घरी आल्यानंतर झाला खुलासा : मृतक आकाश रजत आणि अमान तिवारी या दोघांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही म्हणून त्यांचे नातेवाईक दुपारी त्यांच्या घरी आले. घरातून या दोघांचा कोणताही प्रतीसाद मिळत नसल्याने नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते दोघेही मृतावस्थेत दिसून आले. त्यानंतर लगेच या घटनेची माहिती इमामवाडा पोलीस ठाण्याला कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
राणा प्रताप नगरात आढळला मानवी हाडांचा सांगाडा : नागपूर शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका मोकळ्या भूखंडात दोन दिवसांपूर्वी मानवी हाडांचा सांगाडा आढळला होता. हा सांगाडा साधारणपणे तीन ते चार वर्षे जुना असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्याद्वारे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. निष्कर्षानुसार, हा सांगाडा एखाद्या भिक्षेकरीचा असावा ज्याने कोरोना काळात त्या मोकळ्या भूखंडावरील पडक्या खोलीत आश्रय घेतला असावा आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला असावा. हा मृतदेह तीन ते चार वर्षांपासून एकाच ठिकाणी पडून राहिल्याने त्याचे मानवी सांगाड्यात रूपांतर झाल्याची शक्यता आहे.