वंदे भारत एक्स्प्रेसला गाईची धडक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची ग्वाल्हेर स्टेशनजवळ एका गायीला धडक बसली. या घटनेनंतर सेमी-हायस्पीड एक्स्प्रेस ट्रेनच्या इंजिनच्या पुढील भागाचे नुकसान झाले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.अधिकाऱ्याने सांगितले की, खराब झालेल्या भागाची आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर ट्रेनने पुढचा प्रवास सुरू केला. राणी कमलापतीकडे जाणारी ट्रेन (क्रमांक 20172) संध्याकाळी 6.15 च्या सुमारास गायीला धडकली आणि सुमारे 15 मिनिटे घटनास्थळी थांबली, असे अधिकाऱ्याने सांगितले. ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबराकडे जाणाऱ्या रेल्वे रुळांवर अचानक गाय आल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. आरपीएफलाही घटनास्थळी पाचारण करावे लागले. आरपीएफने गर्दी हटवली आणि त्यानंतर ट्रेनला दिल्लीसाठी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 एप्रिल रोजी राणी कमलापती (भोपाळ) ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या सेमी-हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.