चिमणीऐवजी सिद्धेश्वर कारखानाच स्थलांतरित करणार; पालकमंत्री विखे-पाटील यांची माहिती
सिलोड:श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीबाबत गाळप बंद झाल्यानंतर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले असून, त्याची आयुक्त स्तरावर अंमलबजावणी होईल.
डीजीसीएच्या अहवालानुसार, सरकारने कारखानाच स्थलांतर करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार कार्यवाही होईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे सांगितले.
कुंभारी येथील श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या नवीन बी.एस्सी. महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पालकमंत्री आले होते. यावेळी पत्रकारांनी किमानसेवेसंबंधी विचारलेल्या विविध प्रश्नांवर ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले, सोलापूर शहरातील किमान सेवा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होता. त्यामुळे चिमणीकरील कारवाई थांबविण्यात आली होती. आता गाळप संपल्यानंतर महापालिका आयुक्तांना त्यांच्या स्तरावर आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. डीजीसीएचा अहवालाचा विषय आहे; परंतु यापूर्वी शासनाने चिमणीच नाही, तर कारखानाच स्थलांतर करण्याचे सुचविले होते. त्यानुसार कारवाई करू, असेही पालकमंत्री म्हणाले.
सेतू कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे. जिल्हाधिकाऱयांनी नवीन टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र ती प्रक्रिया होण्यास किलंब लागणार असून, तोपर्यंत जुनेच टेंडर चालू ठेकून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांना देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.