ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जत्रा योजनांचा’ ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ


परभणी:लोक कल्याण’ हे ध्येय उराशी ठेवून शेवटच्या गरजूपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचावा या हेतूने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी निर्णय घेतला आहे.
त्याचाच पहिला टप्पा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी विविध सरकारी योजनांचा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मुख्यमंत्री शासकीय योजना गतीमान अंमलबजावणी अभियानाअंतर्गत ‘जत्रा शासकीय योजनांची’ या कार्यक्रमाबाबत सोमवारी (ता. २४) आयोजित बैठकीत वडदकर हे बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे आणि विकास आवटे यांची उपस्थिती होती.

वडदकर म्हणाले, की राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती जनतेला देत त्याचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

त्यानुसार परभणी जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ‘जत्रा शासकीय योजनांची’च्या माध्यमातून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासन योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे.

जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय, तालुकानिहाय नियोजन करून प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनांचा आराखडा तयार करावा. वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून दिला जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button