काँग्रेसने गावांना दिली सावत्र आईची वागणूक; PM मोदींचा आरोप
यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी स्वातंत्र्यानंतर देशातील गावांना सावत्र आईची वागणूक दिली आणि त्यांच्या विश्वासाला तडा दिला,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सोमवारी केला.अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमाला ते संबोधित करताना मोदी म्हणाले की, भाजप नेतृत्वाखालील सरकारने परिस्थिती बदलली आहे आणि गावांना भरपूर अनुदान दिले आहे. यावेळी मोदींनी कोट्यवधी रुपयांच्या कामांची घोषणा केली.
मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर ज्या पक्षाने सर्वाधिक काळ सरकार चालवले त्या पक्षाने गावातील लोकांच्या विश्वासाला तडा दिला. खेड्यातील माणसे, रस्ते, साठवणुकीची ठिकाणे, शाळा, वीज, अर्थव्यवस्था या सर्व बाबी काँग्रेसच्या राजवटीत सरकारच्या अग्रक्रमाच्या तळाशी होत्या. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ज्या गावांमध्ये राहते त्यांना सावत्र आईची वागणूक देऊन देश प्रगती करू शकत नाही.”
पंतप्रधान मोदी म्हणाले…
nआमच्या सरकारने आठ वर्षांत ३० हजारांहून अधिक नवीन पंचायत इमारती बांधल्या.
nआदरणीय बापू म्हणायचे की भारताचा आत्मा खेड्यात राहतो, पण काँग्रेसने म. गांधींच्या विचारांकडेही दुर्लक्ष केले.
nडिजिटल क्रांतीच्या या युगात पंचायतीही स्मार्ट केल्या जात आहेत.
nआम्ही जनधन योजनेअंतर्गत खेड्यापाड्यात ४० कोटींहून अधिक लोकांची बँक खाती उघडली.