ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

खासदार संजय राऊत यांच्या सभेचा उद्या वरवंडमध्ये धडाका


दोंड: तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील 500 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या सभेचा धडाका बुधवारी वरवंडमध्ये होणार आहे.
दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात या सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, संजय राऊत या सभेत काय बोलणार? कोणाचा पर्दाफाश करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरवंड येथे नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (26 रोजी) सायंकाळी 5 वाजता भव्य सभा होणार आहे. माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी खासदार संजय राऊत यांच्या सभेबद्दल माहिती दिली. या सभेसाठी उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित राहणार आहेत.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये 2016 पासून झालेल्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात लेखापरीक्षण अहवालामध्ये ठेवण्यात आलेला ठपका, तारण न देता उचललेली कर्जे, सरकारकडून 25 कोटी रुपये अनुदान घेऊनदेखील सलग तीन वर्षे बंद ठेवलेला ऊस गळीत हंगाम, कारखान्यावर बँकांची 180 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी भरण्यासाठी एकरकमी कर्जपरतफेड योजनेचा लाभ घेण्यात कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला आलेले अपयश यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि आयकर विभागाला, तसेच याचे पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करीत आमदार कुल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button