“केंद्रीय कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन’
पुणे:संपूर्ण भारतात राष्ट्रीय सहा कामगार संघटनांनी ‘ धरता आंदोलन’ पुकारण्यात आले.त्यामधे एल.आय.सी., बॅंक , टेलीकॉम ,या संघटनांनी पुकारलेल्या धरणा आंदोलनात पुणे शहरात सकाळी ११ ते २ या दरम्यान PGMT ऑफिस , सातारा रोड, पुणे या ठिकाणी धरणा आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने बीएसएनएल व डी.ओ.टी. चे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.त्यांच्या एकूण १५ मागण्या आहेत त्यापैकी काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत-
१) १/१/२०१७ पासून रखडलेले पेन्शन रीवीजन १५ टक्के सहित सर्व बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावि. २)कोरोना काळातले १८ महिन्याचा थकीत IDA मिळावा. ३) महाराष्ट्राचे प्रत्येक जिल्ह्यात सीजीएचएसचा दवाखाना उघडण्यात यावा. ४) संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना फीक्स मेडिकल अलाउन्सरुपये १०००ऐवजी दरमहा रुपये ३००० मिळावा.५)रिस्टोरेशन ऑफ फुल्ल पेन्शन पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षे मर्यादा करण्यात यावी,६) सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी.यावेळी ऑल इंडिया बीएसएनएल व डीओटी पेन्शनर असोसिएशनचे महाराष्ट्राचे परिमंडळ सचिव युसुफ जकाती, महाराष्ट्र बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नागेश नलावडे,AIBDPA उपाध्यक्ष शशांक नायर, अखिल भारतीय सहसचिव पुष्पा फराटे, बबन सूर्यवंशी, पुणे जिल्हा सचिव नफीस काजी, अध्यक्ष नरेंद्र माने, संभाजी मस्तुद , यांनी मार्गदर्शन केले.व केंद्र सरकारकडे जोरदार मागणी केली.केंद्र सरकारने चालवलेली अन्यायकारक नीती बंद केली पाहिजे, आणि आमच्या मागण्या ताबडतोब मान्य केले पाहिजे अन्यथा २१ जुलै २०२३ ला दील्लीमध्ये केंद्र सरकार विरूद्ध वरील मागण्या संदर्भात भव्य मोर्चा काढण्यात येईल असे याप्रसंगी सांगण्यात आले.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.