ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“तीन अपत्य असलेल्या आमदार आणि खासदारांना अपात्र ठरवावं”, अजित पवारांचं बारामतीत विधान


बारामती:जगभरातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच फंडचा (UNFPA) अहवाल अलीकडेच समोर आला आहे. त्यात भारताने लोकसंख्येतबाबतीत चीनला मागे टाकल्याचं सांगितलं आहे.
या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२८ दशलक्ष झाली आहे. तर, चीनची लोकसंख्या १४२५ दशलक्ष एवढी आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं एक विधान समोर आलं आहे.

“तीन अपत्ये असलेल्या खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं,” अशी मागणी अजित पवारांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. ते बारामतीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “देशात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तीन अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता. पण, तीन अपत्य असूनही काही खासदार आणि आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.”

“खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे तीन अपत्य असलेल्या आमदार आणि खासदारांना केंद्र सरकारने अपात्र ठरवावं,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ‘इंडियन एक्प्रेस’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अजित पवारांनी लोकसंख्येवरून जोरदार टोलेबाजी केली होती. “जगात सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या देशात झाली आहे. त्यामुळे आता अतिशय कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. संतती प्राप्ती ही काही देवाची कृपा नव्हे, तर ही नवरा बायकोची कृपा असते. हे कृपया आपण सर्वांनी आता तरी मान्य करायला हवं.”

“लोकसंख्या वाढीमुळे आपल्याला अनेक प्रश्नांना रोज सामोरं जावं लागतं. जगातील सर्वात तरुणांनी संख्या असलेला देश आपण आहोत. पण, भविष्याचा विचार केला पाहिजे. पुढच्या पीढीचं नुकसान होणार नाही, याचं चिंतन केलं पाहिजे आणि कठोर निर्णय घेतला पाहिजे,” असंही अजित पवारांनी म्हटलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button