ताज्या बातम्यामहाराष्ट्र

होणाऱ्या बायकोला फोन करून घेतला गळफास


जळगाव: सहजीवनाचे स्वप्न रंगवत लग्नाचे दिवस मोजत असतानाच सिंधी कॉलनीतील तरुणाने होणाऱ्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.  एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कितेश गौतम बागडे (वय २०, रा. नाथवाडा, सिंधी कॉलनीजवळ, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील नाथवाडा येथे कितेश बागडे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नेहमीप्रमाणे रात्री नऊला तो भावी पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता.

कॉल सुरू असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कितेशची आई गुड्डी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरुणांनी धाव घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी मृत घोषित केले.

येत्या महिन्यात (ता. २७ मे) कितेशचे लग्न होणार होते. परंतु त्याने टोकाचे निर्णय घेतल्याने बागडे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मृताच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम बागडे, लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button