ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ई-केवायसी नसल्याचा दोन लाख शेतकऱ्यांना फटका


अमरावती : शासनाने वर्षभरात पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ई-केवायसी करणे दोन लाख शेतकऱ्यांना महागात पडले आहे. योजनेच्या १३ व्या हप्ताची आकडेवारी आता जाहीर झाली. यामध्ये फक्त ९५,०३० शेतकरी खातेदारांनाच लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
योजनेसाठी ३.३९ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.

पीएम किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षभरात चार हप्त्यांमध्ये प्रत्येकी सहा हजारांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केल्या जात आहे. जानेवारी १०१९ पासून आतापर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे. योजनेमध्ये १९,१४० अपात्र व ११,१७४ आयकरदात्या शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने या लाभार्थ्यांकडून रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरु आहे.
याशिवाय योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याच्या सूचना शासन प्रशासनाद्वारा वारंवार दिल्या जात असतांना त्याकडे अनेक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ते शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. योजनेचा १३ हप्ता फक्त ९५ हजार शेतकऱ्यांनाच वितरीत झाल्याची आकडेवारी आता पुढे आलेली आहे. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button