ताज्या बातम्या

आधीच सांगितलं होतं, मुस्लीम भागात शोभायात्रा काढू नका


पश्चिम बंगाल :पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या मुहूर्तावर झालेल्या हिंसाचारासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केले आहे.
या हिंसाचारावरून त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, मुस्लीम बहूल भागातून यात्रा काढताना सावधगिरी बाळगा, अशा भागातून जाणे टाळा, असा इशारा आधीच दिला होता. यावेळी, मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आल्याचा दावाही ममता यांनी केला. तसेच, यात पोलिसांची काही संशयास्पद भूमिका आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपवर निशाणा साधताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, “ते सांप्रदायिक दंगली घडविण्यासाठी राज्याबाहेरून गुंडांना बोलावत असतात. त्यांच्या मिरवणुका कोणीही रोखल्या नाहीत, पण त्यांना तलवारी आणि बुलडोझर घेऊन मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. हावडा येथे असे करण्याची त्यांची हिम्मत कशी झाली?” माध्यमांतील वृत्तांनुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गुरुवारी सायंकाळी हावडामधील शिबपूर येथे मिरवणूक काढली होती. यादरम्यान प्रचंड हिंसाचार झाला. हिंसाचाराचे कारण समोर आलेले नाही. यावेळी अनेक वाहनेही पेटवून देण्यात आली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, हावडा येथे हिंसाचार झाला कारण मिरवणुकीचा मार्ग चुकीचा होता. त्या म्हणाले, “त्यांनी मार्ग का बदलला आणि एका विशिष्ट समाजावर हल्ला करण्यासाठी ते अनधिकृत मार्गाने का गेले? ते इतरांवर हल्ला करतील आणि कायदेशीर हस्तक्षेपाने त्यांना दिलासा मिळेल, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांना हेही समजायला हेवे की, त्यांना जनता एक दिवस नाकारेल. ज्यांनी काही चूक केली नाही त्यांना अटक होणार नाही. भाजपच्या कार्यकरत्यांमध्ये लोकांच्या घरावर बुलडोझर चालविण्याची हिंमत कशी असे?, असा सवालही ममता यांनी केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button