ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

अबॅकस प्रवेश परीक्षेमध्ये प्रतिष्ठा अमोल देवडकरने मिळवला सर्वोत्कृष्टअबॅकस मास्टर प्रशस्तीपत्र


अबॅकस प्रवेश परीक्षेमध्ये प्रतिष्ठा अमोल देवडकरने मिळवला सर्वोत्कृष्टअबॅकस मास्टर प्रशस्तीपत्र



बीड  : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक शालेय तंत्रांचा वापर केला जातो त्या मधील अतिशय महत्त्वाचं एक गणितीय तंत्र म्हणजेच अबॅकस असून साधारणतः ज्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत आहे या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकरीता एक अतिशय महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. शहरातील अबॅकस स्टडी सेंटर द्वारे अनेक विविध अबॅकस स्पर्धा घडवून आणून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो त्यामधील ज्युनियर अबॅकस लेव्हल मध्ये अतिशय हुशार आणि चाणाक्ष विद्यार्थी कु. प्रतिष्ठा अमोल देवडकरने अबॅकस पहिल्या लेव्हलच्या परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळवून लेवल प्रशस्तीपत्र मिळवलेले आहे. दिनांक 12 जानेवारी 2023 मध्ये प्रतिष्ठा देवडकरने अबॅकस परीक्षेमध्ये अवघ्या फक्त दहा मिनिटांमध्ये 60 प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिलेली असून प्रशस्तीपत्र मिळवले आहेत म्हणून जुलै 2023 मध्ये एकूण सात देशांच्या विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिपसाठी प्रतिष्ठा देवडकरची निवड करण्यात आलेली आहे या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा ही अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. सतत अभ्यास करून घेणे, दिलेले होमवर्क पूर्ण करणे. प्रतिष्ठा देवडकरने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून स्वागत , अभिनंदन, पुढील आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत , असे जिल्हा अबॅकस वितरक एस ए घोडके यांनी सांगितले आहे.

प्रतिष्ठा देवडकर यांचे पालक यांची प्रतिक्रिया = शालेय गणितामध्ये सुद्धा अबॅकसच्या गणितीय तंत्रामुळे खूप चांगल्या प्रकारचा बदल आणि आत्मविश्वास प्रतिष्ठामध्ये निर्माण झालेला आहे असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. अमोल देवडकर व डॉ.कोमल देवडकर प्रतिष्ठा चे पालक


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button