आई वडिलांसह बहिणीची माफी मागत युवकानं संपवलं जीवन; पत्रात लिहिलं आत्महत्येचं नेमकं कारण
अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने एका २४ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने एक पत्र देखील लिहिलं आहे. या पत्रात आई-बाबा-शुभांगी माफ करा असे लिहिले आहे.
अंकुश राऊत असे या तरुणाचे नाव आहे.
मित्रासाठी कर्ज घेतलं पण त्यानेही कर्ज फेडण्यास नकार दिला. यामध्ये चार जणांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद होतं. अखेर या प्रकरणात अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या महिलेसह तरुणाचा मित्र आणि दोन तरुणांविरुध्द पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, ज्या व्यक्तीला घर बांधकामाचा कंत्राट दिला त्यानेही फसवणूक केली. अजु दादा, विजु दादा.. आई-वडिलांना त्रास देऊ नका, पैसे परत कराल, असं म्हणत या तरुणाने आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनूसार, वडिलांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्यांचा मुलगा हा उमरीतील एका डॉक्टरकडे (Doctor)कंपाउंडर म्हणून काम करायचा. त्याने घर बांधकामासाठी ३ लाख रुपयांमध्ये मोठी उमरीतील विजय मालोकार याला कंत्राट दिल्यानंतरही कंत्राटदार बांधकाम करीत नव्हता, तसेच पैसेही परत देत नव्हता, त्याचा भाऊ अजय मालोकारही पैसे परत करत नव्हता.
मनोज अळसपुरे याला अंकुशने अवैध सावकारी व्यवसाय करणारी मंगला देशमुख हिच्याकडून १ लाख ६० रुपये व्याजाने काढून दिले होते, मात्र मनोज अळसपुरे हा पैसा भरत नसल्यामुळे मंगला देशमुख ही अंकुशकडे पैशांसाठी तगादा लावत होती. अंकुश त्या पैशांचे व्याज भरायचा. त्यानंतरही मंगला देशमुख ही दवाखान्यामध्ये जाऊन त्याला शिवीगाळ करायची. यामुळे तणावात वावरत होता. या चौघांमुळे अंकुशने आत्महत्या केल्याचे त्याचे वडील नंदकिशोर राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मोठी उमरीतील अवैध सावकारी व्यवसाय करणारी मंगला देशमुख, मनोज अळसपुरे, अंकुशच्या घराचा बांधकामाचे ३ लाख रुपयांमध्ये कंत्राट घेऊनही बांधकाम न करणारे विजय व अजय मालोकार यांच्याविरुद्ध तक्रार दिली. अंकुशनेही आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या चौघांच्या नावांचा उल्लेख केला. आत सिव्हिल लाइन पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा केला आहे.