गौतमी तिच्या एका कार्यक्रमसाठी किती मानधन घेते
‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil), ‘गौतमीकी झलक सबसे अलग’… सध्या लावणी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं.अश्लील डान्समुळे चर्चेत आलेल्या गौतमीच्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात. यशाच्या शिखरावर असलेली ही गौतमी तिच्या एका कार्यक्रमसाठी किती मानधन घेते? (Gautami Patil Earning) हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
मोठमोठ्या कलाकारांचे शो सोडून प्रेक्षक गौतमीची लावणी पाहण्यासाठी येतात. झाडावर चढून, भिंतीवर बसून, जिथे जागा मिळेल तिथून गौतमीची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर असतात. डान्स करताना अश्लील कृत्य केल्यामुळे काही संघटनांनी तिचा विरोध केला. परंतु गौतमीच्या कार्यक्रमांवर याचा तीळमात्र फरक पडला नाही.
गौतमीने दहावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर डान्स शिकायला सुरुवात केली. तिने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून सादरीकरण केले आणि या कामासाठी तिला ५०० रुपये मिळाले. अशाप्रकारे गौतमी डान्स क्षेत्राकडे वळली. गौतमी अनेक ठिकाणी बॅक डान्सर म्हणून काम करायची. यावेळी गौतमीला एका कार्यक्रमाचे फक्त ५०० ते १००० रूपये मिळायचे.
पण गेल्या काही महिन्यांपूर्वी तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या यशाच्या आणि प्रसिद्धीच्या जोरावर गौतमी एका शोसाठी दीड ते दोन लाख रूपये घेते. परंतु गौतमी या गोष्टीला स्पष्ट नकार देते. ‘लोकांचा हा मोठा गैरसमज आहे की गौतमीला आता या कार्यक्रमातून मोठे मानधन मिळते. पण तसं अजिबात नाही’, असे गौतमी म्हणते.