ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाहित महिलेवर मामेभावानेच केला लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक


चद्रपूर: कोरपना तालुक्यातील तेलंगाना सीमेजवळील एका गावातील विवाहित महिलेवर नवऱ्याच्या नातेसबधातील चुलत मामे भावाने बदनामीची धमकी देत जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२)(एन), ३५४, ४१७, ५०६ भादवी कलमानुसार गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.
शुभम तलांडे ( २२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.



पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नवऱ्याचा चुलत मामे भावाने पिडीतेची मागील एक महिन्यापासून छेडखानी करून तिला बदनामीची धमकी देत होता. २० एप्रिलला पिडीत विवाहित महिला घरात एकटी असताना त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा दोनदा धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १० मे ला हात धरून बकऱ्या चरायला चाल म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. कंटाळून पीडित महिलेने पतीसह कोरपना पोलीस स्टेशन गाठून बुधवारी तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमानव्ये शुभम तलांडे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी संजय शुक्ला व कोरपना पोलीस करीत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button