ताज्या बातम्या

लाकशाही न्युज24 चा दनका !पुणे शहर युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अखेर पुणे एसटी भरती मधील मुलांना भेटला न्याय


पुणे शहर युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अखेर पुणे एसटी भरती मधील मुलांना भेटला न्याय
मागील चार वर्षापासून मृत अवस्थेत पडलेल्या 2019 एसटी महामंडळ सरळ सेवा भरती मधील झोपेचे सोंग घेतलेल्या पुणे विभागाला जागे करण्याचे काम लाकशाही न्युज24 आणी पुणे शहर युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व पुणे शहर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल शिरसाठ यांनी केले आहे.मागील 4 वर्षापासून पुणे विभागातील 1647 मुलांना मरण यातना देणाऱ्या,त्यांना वनवासात टाकणाऱ्या,मुलांकडून फॉर्म भरून त्यांची भरती पूर्ण न करणाऱ्या, कोणतेही रीतसर कारण नसताना 4 वर्षापासून 1647 मुलांना शासकीय नोकरी पासून वंचित ठेवणाऱ्या, पुणे विभागाला आज राहुल शिरसाट यांच्यासमोर नमते घ्यावे लागलेच. राहुल शिरसाट हे नाव आज पूर्ण महाराष्ट्राला एमपीएससीच्या आंदोलनामुळे परिचित झालेले आहे. 4 वर्षापासून नोकरीसाठी जंग जंग पछाडणारा पुणे विभागातील मुलांसाठी 21 जून हा दिवस त्यांच्या आयुष्यातील एक आशेची नवी किरण घेऊन आला. एसटी महामंडळाने 2019 मध्ये (दुष्काळग्रस्त) भागातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी 12 विभागांमध्ये 4416 जागांची चालक तथा वाहक पदाची जाहिरात काढली होती.त्यामध्ये पुणे विभागात 1647 जागा भरल्या जाणार होत्या. यामध्ये सर्वात जास्त मुले हे बीड जिल्ह्यातील आहेत. दुष्काळग्रस्त जिल्हा असल्याने व भविष्यात बीड जिल्ह्यात बदली भेटेल या आशेने खूप बीड जिल्ह्यातील खूप मुलांनी पुणे विभागात फॉर्म भरलेले आहेत.जास्त जागा असल्याकारणाने पूर्ण महाराष्ट्रातील मुलांनी पुणे विभागात फॉर्म भरले 24 फेब्रुवारी 2019 ला पुणे विभागात 7148 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यानंतर त्यांची कागदपत्र छाननी झाली,त्यानंतर शारीरिक चाचणी झाली,त्यानंतर मेडिकल या सर्वांमधून 2982 मुले भोसरी येथील वाहन चालन चाचणीसाठी पात्र ठरले. लोकल विभाग असल्याने सर्वात जास्त जागा असून सुद्धा पुणे विभागातील मुलांच्या वाहन चाचण्या सर्व शेवटी घेण्यात आल्या. 17 जानेवारी 2020 पासून पुणे विभागातील वाहन चालन चाचणी साठी त्यांना 17 जानेवारी 2020 पासून बोलावण्यात आले.पण 2240 मुलांच्या ट्रायल चाचण्या झाल्यावर 25 फेब्रुवारी 2020 रोजी भोसरी येथील वाहन चालन चाचणी केंद्र बंद पडले व आतापर्यंतचे बंदच आहे. यासाठी पुणे विभागातील मुलांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,अनेक मंत्री, खासदार,अनेक आमदार यांना पाठपुरावा केला पण याचा कोणताही उपयोग झाला नाही.शेवटी मुलांनी 20 फेब्रुवारी 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण केले त्यावेळेस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष श्री शेखर चने साहेब यांनी मुलांना आश्वासन दिले होते की येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये तुमची भरती सुरू केली जाईल.पण त्यानंतर सुद्धा ही भरती सुरू झाली नाही.त्यामुळे परत मुलांनी 15 मे ला आझाद मैदान मुंबई ला उपोषण केले त्यानंतर महाव्यवस्थापक अजित गायकवाड साहेब यांनी पुणे विभागाला व भोसरी ट्रॅक ला लेखी आदेश दिले होते की (1) येणाऱ्या 15 जून 2023 पासून पुणे विभागातील राहिलेल्या मुलांच्या ट्रायल घेण्यात यावे.(2) ट्रायल झाल्याबरोबर तात्काळ त्यांच्या अंतिम निवड यादी जाहीर कराव्यात व त्याचा अहवाल सेंट्रल ऑफिस मुंबईला पाठवावे.असे आदेशात म्हटले होते तरीपण पुणे विभागात या राहिले राहिलेल्या मुलांची ट्रायल घेतली जात नव्हती.त्यावेळेस हे प्रकरण पुणे शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागाला त्यांच्या पद्धतीने 21 तारखेच्या आंदोलनाचे पत्र दिले व त्यानंतर पुणे विभागात अशी हालचाल झाली जी मागील चार वर्षात कधी झाली नव्हती.आतापर्यंत भरती कधी सुरु होईल हे आम्हाला माहित नाही असे सांगण्याऱ्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी राहुल शिरसाठ यांच्या आंदोलनाचा धसका घेत तात्काळ 5 जुलै 2023 पासून राहिलेल्या मुलांचे ट्रायल घ्यावयाचे परिपत्रक काढले. हे शक्य झाले ते फक्त राहुल शिरसाठ व त्यांच्या पुणे शहर युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे.यामुळे पुणे विभागातील मुलांनी विभागीय कार्यालयातच त्यांचा व त्यांच्या पूर्ण टीमचा जाहीर सत्कार केला.यावेळी राहुल शिरसाठ व पुणे शहर युवक काँग्रेसच्या चा विजय असे अश्या घोषनांनी विभागीय नियंत्रक कार्यालय गाजत होते.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button