भारतावरील टॅरिफ मागे?, अमेरिकेतील बैठकीत फैसला, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आनंदाची बातमी…

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सातत्याने धक्कादायक अशी निर्णय घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा ठप्प झाली.
हेच नाही तर अमेरिकेच्या व्यापार टीमचा भारताचा नियोजित दाैरा ऑगस्टमध्ये होता. मात्र, अचानक टॅरिफच्या वादात त्यांचा हा दाैरा रद्द करण्यात आला. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता डोनाल्ड ट्रम्प हे फार अगोदरपासूनच आग्रही आहेत. भारताने ही तेल खरेदी सुरूच ठेवल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट सुरू आहे. भारताबद्दल धक्कादायक विधाने करतानाही ते दिसले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य केले. फक्त भाष्यच नाही तर आमच्या दोन्ही देशातील संबंध खूप जास्त मजबूत आहे. मी नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांना जसेचे तसे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दाैरा रद्द केल्यानंतर मोठे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.











