ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

तीन वर्षाच्या कारकिर्दीत मी अनुभवलेला निर्भीड पत्रकार नवनाथ आडे


तीन वर्षाच्या कारकिर्दीत मी अनुभवलेला निर्भीड पत्रकार नवनाथ आडे



नवनाथ आडे यांना पत्रकारितेत तीन वर्षे पूर्ण
_______________________________

बीड  : पत्रकारिता हे आधुनिक सभ्यतेचा एक प्रमुख घटक आहे. ज्यामध्ये बातम्या गोळा करणे, लेखन, संपादन, योग्य सादरीकरण असे बरेच घटक यामध्ये येतात. आम्हाला पत्र करीत आहे क्षेत्र फार आवडीची वाटते कारण यामध्ये कुठल्याही प्रकारे स्वतःचा स्वार्थ न बघता समाजाला एका आधुनिक प्रवाहात आणण्यासाठी व बेकायदेशीर धंदे करणाऱ्या व्यक्तीला समाजासमोर आणून समाज पवित्र घडविण्यासाठी पत्रकारिता हे एक मोलाचे कार्य करते. आणि जेव्हापासून मी साहित्य क्षेत्राकडे वळलो तेव्हापासून बऱ्याच पत्रकारांच्या संपर्कात आलो व पत्रकारितेचा मी फार जवळून अनुभव घेत आहे आणि आज हा लेख लिहिण्याचे कारण असे की आज माझे एक पत्रकार मित्र आहेत व त्यांना पत्रकारितेमध्ये येऊन आज जवळपास तीन वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांच्या या तीन वर्षाच्या कारकीर्दीत मी त्यांच्या प्रत्येक कामाचा आढावा घेतलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत एखाद्या विषयावर निर्भीडपणे आवाज उठविणे हे त्यांचे प्रमुख गुणवैशिष्ट्य आहे.
नवनाथ आडे असे या पत्रकाराचे नाव आहे. हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोमलवाडी या गावांमध्ये राहतात व तीन वर्षांपूर्वी पत्रकारिता मध्ये त्यांनी प्रवेश केला होता तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते निर्भीडपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा अभिमान तर वाटतोच आणि वाटायलाच पाहिजे कारण नवनाथ आडे हे दिव्यांग आहेत पण त्यांच्यासाठी दिव्यांग ही त्यांची कमजोरी नसून ताकद बनली आहे हे त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वाच्या बळावर सिद्ध केले आहे. आणि मला एक गोष्ट समजली की भलेही आपल्या मध्ये एखादी शारीरिक उणीव असेल तरीसुद्धा ती आपल्या दह्यात अडचण निर्माण करत नाही जोपर्यंत आपण तिला आपली कमजोरी समजत नाही ते निर्भीडपणे आपलं काम करीत आहेत व समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात ना तलवारीच्या टोकापेक्षा पेनीचे टोक हे अधिक धारदार असते आणि अशाच आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून नवनाथ आडे हे तेथील जनतेला न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. कर्तुत्व, नेतृत्व ,आणि वक्तृत्व हे तीनही गुण त्यांच्याजवळ आहेत आणि आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर एका शिक्षित व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व ते करीत आहेत आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे वक्तृत्व करून समाज परिवर्तन घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. जर आपण एखाद्या विरुद्ध बातमी प्रसारित केली असेल तर समोरील व्यक्तीचा आपल्यावर दबाव येतो तसा यांच्यावरही बऱ्याचदा आला पण त्यांनी धमकीला बळी न पडता एक खरा पत्रकार या नात्याने आपल्या पत्रकारितेचा वारसा जपला आहे आणि पुढेही जपत राहतील अशी मला गॅरंटी आहे. शेवटी त्यांना एवढेच सांगेन की, जर आपल्याला कायमस्वरूपी लोकांच्या मनामध्ये अमर राहायचं असेल तर दोनच गोष्टी कराव्या लागतात एक म्हणजे वाचण्याला एक असं काहीतरी लिहून जाणे आणि दुसरे म्हणजे आपल्या नावावर एक नवा इतिहास रचला जाईल असे कार्य करून जाणे म्हणजे अमर होण्याचा मार्ग होय. एवढेच सांगेन मी की जशी ताकद आता तुमच्या लेखणीमध्ये आहे तीच ताकद , तोच जोश, तोच निर्भीडपणा कायमस्वरूपी तुमच्या सोबत ठेवा आणि एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करा पुनश्च एकदा माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेच समाजकार्य तुमच्यातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– लेखक स्वप्निल गोरे
पत्ता : सावरगाव गोरे
तालुका : पुसद
जिल्हा : यवतमाळ


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button