राज्यापालांचा राजीनामा राज्यसरकार घेतं का? राज्यपालांना पदावरुन कोण हटवू शकतं?
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. सध्या सुद्धा अशाच वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टिका होत आहे. जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईच्या अस्मितेबाबत वादग्रस्त वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे विरोधक तर राज्यातील सत्ताधारी पक्षाला राज्यपालांचा राजीनामा घेण्याची मागणी करत आहे. पण खरंच राज्यापालांचा राजीनामा राज्यसरकार घेतं का? राज्यपालांना पदावरुन कोण हटवू शकतं? या विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
राज्यपालांना पदावरुन कोण हटवू शकतं?
राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यामुळे त्यांना हटवण्याबाबतचा निर्णय सुद्धा केवळ राष्ट्रपतींच्या हातात असतो. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन फक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचं हटवू शकतात. मात्र यात विशेष सांगायचं म्हणजे आपल्या देशात राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करतात. त्यामुळे राज्यपालांची नेमणूक जरी राष्ट्रपती करत असले तरी पंतप्रधानांच्या इच्छेनुसारचं होते.
याशिवाय राज्यपालांना हटवण्यासाठी कोणालाही कोर्टात दाद मागता येत नाही. यासाठी राष्ट्रपतींकडे विनंती अर्ज करू शकता. कारण राष्ट्रपतीचं राज्यपालांना हटवू शकते.
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते. राष्ट्रपती पदासाठी पात्रता म्हणून ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करु शकतात. शिवाय राज्यपालाला पदावरुनही हटवू शकतात.