एकाच कुटुंबातील ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक आई व मुलगा ठार

वाळूजमहानगर : भरधाव येणाऱ्या काळरुपी एसटी महामंडळाच्या बसने एकाच कुटुंबातील ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बैलगाडी मधील आई व मुलगा ठार झाले.
तर तिचा पती व मुलगा असे दोन जखमी झाले आहेत. या अपघातात बैलगाडीचा चुराडा झाला असून एक बैलसुध्दा जागीच ठार तर दुसरा जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ईसारवाडी फाट्याजवळ झाला.
या अपघातात बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मानिकपुंज ता.नांदगाव जि. नाशिक येथील ऊस तोड कामगार गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे, सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जुन गोविंद गिरे असे एकाच कुटुंबातील 4 जण बैलगाडीतून औरंगाबाद पुणे महामार्गाने जात होते. त्यांची बैलगाडी ईसारवाडी फाट्याजवळील इंडियन ढाबापासून महामार्ग ओलांडत होती.
त्याचवेळी नाशिककडून औरंगाबादकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस (एम एच 14, बीटी – 2500) ने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिली. मंगळवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात बैलगाडी मधील सोन्याबाई गोविंद गिरे (वय 40) व अर्जुन गोविंद गिरी (वय 10) आई व मुलगा असे दोन जण ठार झाले तर या महिलेचा पती गोविंद गिरे (वय 45) व मुलगा बाळू गोविंद गिरे (वय 15) जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे हा अपघात इतका भीषण होता की, बसच्या धडकेत गाडी बैलगाडीचा चुराडा होऊन बैलगाडीच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा जखमी आहे. अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद हानिफ, पोलीस अंमलदार विक्रम मडावी, जयेश जाधव, एस ए गवळी यांनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान सर्व जखमींना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिजच्या रुग्णवाहिकेचे संदीप त्रिंबके व 108 सरकारी रुग्णवाहिकेचे डॉ. अनंत पाटील व पायलट मुसा शेख यांनी उपचारार्थ गंगापूर व औरंगाबाद घाटीत दाखल केले.