एकाअधिकाऱ्याच्या पत्नीने मुलांचं लग्न तोंडावर असताना आत्महत्या
सोलापुरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने मुलांचं लग्न तोंडावर असताना आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे.लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या स्नेहलता या पत्नी आहेत. (Solapur additional chief executive officer Snehalata Prabhu Jadhav wife suicide )
मुलाच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आलेल्या स्नेहलता यांनी लातूर येथील रविवारी हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी त्यांनी नातेवाईकाला फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबर लग्न रोजी होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. शनिवारी रात्री उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमीत्त लातूरला गेले. दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूर मधील नातेवाईकाला फोन करत जोरजोराने रडत आपण ‘आत्महत्या करणार’ असे सांगितले.
maharashtra politics: सुप्रिया सुळेंनी शंभुराज देसाईंच्या कानात केली कुजबुज अन्…
त्यानंतर नेमकं काय घडलं?
नातेवाईकांनी समजून सांगत या घटनेची माहिती सोलापुरातील नातेवाईकांना दिली. जेमतेम दहा ते पंधरा मिनिटांनी सोलापुरातील नातेवाईक हॉटेलवर गेल्यानंतर हॉटेलचा दरवाजा बंद आढळला. यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या.
त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना लगेच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. स्नेहलता यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.