बीड:असं स्टेटस ठेवलेल्या मुलाचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू
बीड 24 नोव्हेंबर : बीडच्या पाटोदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही, असं स्टेटस ठेवलेल्या मुलाचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ही धक्कादायक घटना बीडच्या पाटोदा तालुक्यातील जाधव वस्ती येथे घडली. घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही, असं फेसबुक स्टेटस या तरुणाने रात्री ठेवलं होतं.
यानंतर सकाळीच तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कृष्णा दिलीप जाधव असं मयत तरुणाच नावं आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
पाटोदा तालुक्यातील जाधव वस्तीवरील कृष्णा जाधव हा दररोज सकाळी लिंबादेवी फाटा येथे दूध विक्रीसाठी घेऊन जायचा. दुचाकीवरून तो जात असे. रात्री उशिरा त्याने सोशल मीडियावर ‘मी मरायला घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही… कोण पण समोर येऊ दे…’ असं स्टेटस ठेवलं होतं.
सकाळी कृष्णा नेहमीप्रमाणे घरातील दूध बरोबर घेऊन दुचाकीवरून (एमएच १२ सीयू २९१३) लिंबादेवी फाट्यावरील डेअरीकडे निघाला होता. विवाहित प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने चढला पारा; पुण्यातील प्रियकराने गाठला क्रूरतेचा कळस सकाळी सात वाजेच्या सुमारास निरगुडी ते लिंबादेवीदरम्यानच्या परिसरातून पुलाजवळून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना कृष्णा हा गंभीर अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. तातडीने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या डोक्याला आणि उजव्या हाताच्या खांद्याजवळही गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.