ताज्या बातम्या

जीडीपीच्या बाबतीत अमेरिका आणि चीन भारताच्या मागे


नवी दिल्ली: जागतिक मंदी आणि जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या मंदावलेल्या वाढीदरम्यान, भारत हा आशेचा किरण आहे. अनेक तज्ञ आणि जागतिक संस्था सतत भारतीय अर्थव्यवस्थेच्या संभाव्यतेवर आपापली मते मांडत असतात.नुकतेच गोल्डमन सॅक्सने म्हटले होते की, 2075 पर्यंत भारत जीडीपीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकेल. आता ब्रिटनच्या एका खासदाराने असाच दावा केला आहे.



ब्रिटनचे खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया म्हणतात की, 2060 पर्यंत (India GDP) भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. लॉर्ड बिलिमोरियाचा हा अंदाज गोल्डमन सॅक्सपेक्षा जास्त आहे. गोल्डमन सॅक्सच्या मते, भारत 2075 पर्यंत अमेरिकेला मागे सोडेल, परंतु भारताच्या जीडीपीचा आकार चीनपेक्षा कमी असेल. त्याचवेळी, ब्रिटिश खासदार म्हणतात की 2060 मध्येच भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, ती चीनलाही मात देईन.

ब्रिटिशांना या गोष्टींवर विश्वास

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, लॉर्ड बिलिमोरिया बेगमपेट येथील हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, (India GDP) भारताने नुकतेच ब्रिटनला मागे टाकले आहे आणि आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. भारत लवकरच जगातील तीन महासत्तांमध्ये सामील होणार आहे यात शंका नाही. माझा अंदाज आहे की पुढील 25 वर्षांत भारत 32 ट्रिलियन डॉलर्ससह जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2060 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा माझा विश्वास आहे.

सध्या या देशांचा जीडीपी भारतापेक्षा जास्त

भारताचा जीडीपीचा आकार सध्या $3.5 ट्रिलियन आहे. (India GDP) अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे ज्याची 26 ट्रिलियन डॉलर्स आहे. त्यानंतर चीन 20 ट्रिलियन डॉलर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनी आणि आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जपानही भारताच्या पुढे आहे. पुढील दीड वर्षात भारताचा जीडीपी जपानपेक्षा मोठा असेल, असे अनेक अंदाज सांगत आहेत.

आयएमएफने हा अंदाज वाढवलाब्रिटीश खासदाराची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आपले ताजे अंदाज जाहीर केले आहेत. IMF च्या मते, (India GDP) भारताचा आर्थिक विकास दर या वर्षी 6.1 टक्के असू शकतो. यापूर्वी एप्रिलमध्ये आयएमएफने सांगितले होते की, भारताचा आर्थिक विकास दर यंदा 5.9 टक्के राहू शकतो. याचा अर्थ IMF ने आपल्या अंदाजात 0.2 टक्क्यांनी वाढ केली आहे.,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button