मिरचीचे हेक्टरी आता 130 क्विंटल उत्पादन मिळणे शक्य,शास्त्रज्ञांनी केले हे मिरचीचे नवीन वाण विकसित
मिरची हे भाजीपाला पिकांमध्ये एक महत्त्वपूर्ण पीक असून महाराष्ट्रामध्ये मिरचीची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. मिरचीची लागवड प्रामुख्याने हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी आणि लाल मिरचीसाठी प्रामुख्याने केली जाते. मिरचीला आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे मिरची शिवाय स्वयंपाक घर अपूर्णच राहते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
या कारणामुळे मिरचीला बाजारपेठेमध्ये वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे दर देखील चांगले मिळतात. या दृष्टिकोनातून जर आपण मिरची पिकाच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या वाणाचा विचार केला तर त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असून शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत.
विविध पिकांचे वाण विकसित करण्याच्या कामांमध्ये देशातील विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन संस्था यांचा मोलाचा सहभाग असतो. अशा संस्थांचा देखील शेतकरी बंधूंना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. याच पार्श्वभूमीवर जर आपण मिरची पिकाचा विचार केला तर भाजीपाला संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एक नाविन्यपूर्ण मिरचीचे वाण विकसित केले असून शेतकरी बंधूंसाठी ते खूप फायद्याचे ठरू शकते. या लेखामध्ये आपण या वाणाबद्दल विशेष माहिती घेऊ.
शास्त्रज्ञांनी विकसित केले मिरचीचे ‘व्हीपीबीसी 535′ वाण
मिरचीचे हे वाण भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञांनी विकसित केले असून या वाणाची महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची सरासरी उत्पादन क्षमता ही हेक्टरी 130 ते 140 क्विंटल इतकी आहे. तसेच मिळालेल्या माहितीचा विचार केला तर या जातीची बाजारपेठेतील भाव हे इतर सामान्य मिरचीपेक्षा तीन पटीने जास्त असल्याचे देखील म्हटले गेले आहे.
तसेच या वाणाची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकरी बंधू करू शकतात. मिरचीचा हा वाण काशी सिंदुरी म्हणून देखील ओळखला जातो. जर आपण या मिरचीच्या वाणांचा विचार केला तर हा वाण जास्त उत्पादनक्षम आहे. व्हीपीबीसी 535 मिरचीचे वाणाचे हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बियाणे लागवडीसाठी पुरेसे ठरते.
हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या