अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिराच्या सुशोभीकरण

अक्कलकोट येथील स्वामी मंदिराच्या निर्मितीनंतर प्रथमच म्हणजे 140 वर्षांनंतर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. याअंतर्गत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या गर्भगृहाचा आतील भाग व गाभारा मंडपाच्या परिसराचे नूतनीकरण करण्यात आले. चांदीचा दरवाजा, गाभारा, मेघडंबरी तयार करण्याचे काम नाना वेदक यांना मिळाले. वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मागदर्शनाखाली काम झाले. चांदीच्या पत्रावरील कलाकुसर, सोन्याची पेटी, दरवाजा आदी पद्धतीचे काम नानांनी केले. नानांनी दोन वर्षांपूवी स्वामींचा मुखवटा तयार केला होता. त्यानंतर अभिषेक पात्र, जलाभिषेक पात्रही त्यांनी घडवले होते. त्यानंतर स्वामी मंदिराच्या गाभाऱयाचे काम त्यांच्याकडे आले. तीन महिने हे काम सुरू होते. त्यासाठी त्यांनी महिनाभर अक्कलकोटला वास्तव्य केले. ही कारागिरी स्वामी भक्तांच्या पसंतीस उतरली असून यापेक्षा मोठे समाधान ते काय, असे नाना म्हणतात. देवांना आभूषणांसह वेगळ्या रूपात बघून भाविक खूश होतात. देवांचे दागिने करणाऱया मोजक्या कारागिरांपैकी आपण असल्याचे नाना विनम्रपणे सांगतात.
गणरायाला आभूषणांचा साज
दागिने घडवणे हा वेदक कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय. नानांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. आज त्यांच्या दुकानांत 17 कुशल कारागीर काम करतात. 1994 साली प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाचा मुकुट त्यांनी पहिल्यांदा घडवला. त्यानंतर मंदिरातील दागिने करायला त्यांनी सुरुवात केली. सिद्धिविनायकासाठी त्यांनी कित्येक मुकुट तयार केले. त्यासोबतच अन्य मंदिरांतील देवांचे दागिने तयार करण्याचे काम त्यांच्याकडे यायला लागले. त्यानंतर 2006 साली एक महत्त्वाच्या टप्पा त्यांच्या आयुष्यात आला. त्यांच्याकडे ‘लालबागचा राजा’ची सोनपावलं तयार करण्याचे काम आले. तेव्हापासून नाना मुंबईतील मोठमोठय़ा गणेश मंडळांची कामं करत आहेत. लालबागचा राजा, गणेशगल्ली, गिरगावचा राजा, फोर्टचा राजा अशा सुमारे 80 टक्के मंडळांच्या गणपतींची सोन्याचांदीची आभूषणे ते घडवत आहेत.
‘लालबागचा राजा’च्या पावलांवर नारळाची तोरणं वाहिली जातात. भाविक माथा टेकतात. अशा वेळी पावलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोनपावलं तयार करण्याचे ठरले आणि हे काम आपल्याकडे आले. अतिशय कौशल्यपूर्ण- आव्हानात्मक असे हे काम होते, अशी माहिती नानांनी दिली. त्यानंतर ‘लालबागचा राजा’चे सगळे दागिने त्यांनी घडवले. मंडळाचे ते अधिकृत सोनार आहेत. महालक्ष्मी, एकविरा आईचा मुखवटाही त्यांनी घडवला आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत समाजातील गरजूंना मदत करण्याचे कामही ते करत आहेत.
हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या