ताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुबळी येथे कार अपघातात पोलीस उपनिरीक्षक ठार


निपाणी:हुबळी-विजापूर रोडवर कारची पुलाला धडक होऊन झालेल्या अपघातात हुबळी येथील हेस्कॉम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन कुलकर्णी (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि. ३०) सकाळी झाला. घटनेची नोंद हुबळी ग्रामीण पोलिसांत झाली आहे.



याबाबतची अधिक माहिती अशी की, कुमारगोपा (ता. नवलगुंद, जि. धारवाड) येथील रहिवाशी असलेले मलिकार्जुन कुलकर्णी मागील १३ वर्षापासून पोलीस खात्यात सेवेत होते. सध्या ते हुबळी हेस्कॉम विभागात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. आज सकाळी ते आपली ड्युटी संपवून आपल्या मूळगावी कारने जात होते. दरम्यान, त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कारची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय मुर्गेश चनन्नावर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. कुलकर्णी यांचा कारमध्ये अडकलेला मृतदेह नागरिकांनी बाहेर काढला.

कुलकर्णी यांनी यापूर्वी अथणी, कागवाड, कित्तूर यासह बागलकोट जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम केले होते. ते मनमिळावू व हळव्या स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. कुलकर्णी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button