महत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

नवऱ्याने बायकोसाठी चेक केला घरचा सीसीटीव्ही;नवऱ्याला व्हिडीओत असं काय दिसलं?


मुंबई : अशी कधी काही प्रकरणं समोर येतात, ज्याचावर विश्वास ठेवणं देखील कठीण होऊन बसतं. असंच एक प्रकरण समोर आलं, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्यासोबत घडलेला किस्सा सांगितला ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

या व्यक्तीने आपली बायको फोन उचलत नाही म्हणून आपल्या घरी लावलेले सीसीटीव्ही चेक केलं. तेव्हा त्याला जे दिसलं, ते पाहून त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. नवऱ्याला व्हिडीओत असं काय दिसलं? नवऱ्याने सीसीटीव्हीत पाहिलं की त्याच्या बायकोने गळफास लावून घेतला आहे आणि तिचं शरीर पंख्याला लटकत आहे. हे पाहिल्यानंतर या महिलेचा नवरा घाबरला आणि त्याने घराच्या बाजूला राहाणाऱ्या एका व्यक्तीला घरी जाण्यासाठी सांगितले.

या शेजारील व्यक्तीने दरवाजा तोडला आणि या महिलेच्या शरीराला खाली आणले आणि जवळील एका नर्सला मदतीसाठी बोलावले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

नक्की असं का आणि कशासाठी घडलं? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला हाय प्रोफाईल आयुष्य जगण्याची सवय होती, ज्यामुळे तिच्यावर ही वेळ आली. इंदौरमधील लासुडिया येथे राहाणाऱ्या या महिलेचं नाव करुणा आहे.



या महिलेला हाय प्रोफाईल जीवनशैली जगण्याची सवय होती. बिसी चालवताना झालेल्या नुकसानीमुळे महिलेवरील कर्ज वाढले होते. ही घटना कांचन विहार कॉलनीतील स्कीम क्रमांक 114 मधील आहे. करुणा शर्मा ही महिला पती उत्तम शर्मासोबत राहत होती.

जास्त पैसे मिळवण्यासाठी ती बिसी देखील काढायची यासाठी तिने तिच्या नातेवाईकांकडून देखील पैसे घेतले होते. परंतू अनेक दिवसांनंतर देखील तिला ते पैसे परत करता आले नाहीत, ज्यामुळे तिच्यावर नातेवाईक आणि इतर मंडळी प्रेशर टाकू लागले, ज्यामुळे अखेर तिने आपलं आयुष्य संपवण्याचा विचार केला, असं म्हटल जात आहे.

खरंतर करुणाला फोन करुन तसेच तिच्या एका साथिदाराने घरी घुसुन धमकी दिली होती. बँकेतून देखील लोकांचे फोन यायचे ज्यामुळे करुनाला टेन्शन आलं होतं, ज्यानंतर या त्रासाला कंटाळून करुणाने आपला नवरा आणि आठ वर्षाच्या मुलीला 700 किमी लांब पाठवले.

ज्यानंतर लोकांच्या भीतीने करुणाच्या नवऱ्याने घरी सीसीटीव्ही देखील लावला होता. त्यामुळेच तिच्या नवऱ्याला नक्की काय घडलं हे सगळं फोनमध्ये पाहाता आलं. लासुदिया पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी संजय कुशवाह यांनी सांगितले की, महिलेला फाशी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळावरून सात पानी सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button