क्राईम

आणि एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली आणि आई-वडिलांनी संपवले


केरळमधीलकोल्लम जिल्ह्यात एक प्रकार समोर आला आहे. येथे एक मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. आणि तिथल्या एका मुलावर प्रेम करू लागली. तिच्या घरच्यांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तिला विरोध केला. पालकांचा असा विश्वास होता तो मुलगा त्यांच्या मुलीसाठी लायक नव्हता.



आणि एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली

आई-वडिलांचा विरोध पाहून एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली. तिच्या जाण्यानंतर आई-वडील फार दु:खी झाले. नैराश्यात जगू लागले. त्यांच्या उपचारासाठी औषधे घेणे सुरू केले. औषधांच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कोल्लम जिल्ह्यातील पावुंबा येथील रहिवासी उन्नीकृष्ण पिल्लई आणि त्यांची पत्नी बिंदू पिल्लई अशी मृतांची नावे आहेत. मुलीच्या अशा कृत्यामुळे हे दाम्पत्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, असे पोलिसांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button