ताज्या बातम्या

हा शेअर आहे, की पैसे छापायचं मशीन? 10,000 रुपयांचे केले 5 लाख; गुंतवणूकदार मालामाल!


शेअर बाजारात बालाजी अमाईन्सच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 50 पट वाढ झाली आहे. जर दहा वर्षांपूर्वी एखाद्याने या कंपनीत 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 5 लाख रुपये झाले असतेया शेअरने गेल्या तीन वर्षांत बीएसईवर 724% एवढा परतावा दिला आहे.



मेथिलामाइन्स, इथिलामाइन्स, स्पेशिअलिटी केमिकल्स आणि नैसर्गिक उत्पादने तयार करणाऱ्या या कंपनीचे मार्केट कॅप 7,100 कोटी रुपये एवढे आहे. ही कंपनी देशातील आणि जगातील फार्मा आणि कीटकनाशक कंपन्यांना पुरवठा करते. TTM बेसिसवर शेअरचा EPS 70.23 एवढे आहे. तो सध्या 5.12 PB वर ट्रेडिंग करत आहे. हा शेअर शुक्रवारी NSE वर 2.30 टक्क्यांनी वाढून 2,206.00 रुपयांवर बंद झाला.

एनालिस्ट्सच्या म्हणण्यानुसार, या शेअरमध्ये सध्या तेजीचे संकेत आहेत. जर हा शेअर सपोर्ट लेव्हलवर कायम राहिला, तर यात आणखी तेजी येऊ शकते. जीसीएल ब्रोकिंगचे रिसर्च अ‍ॅनालिस्ट वैभव कौशिक यांचे म्हणणे आहे की, बालाजी अमीन्सचा स्टॉक आपल्या ट्रेंड लाईन सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे. डेली चार्टवर याने बुलिश ट्रेंड दाखवला आहे. हा शेअर जर 2,120 रुपयांवर कायम राहिला, तर 200 डबल एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अ‍ॅव्हरेजला टच करू शकतो. जो 2,468 रुपयांवर आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button