ताज्या बातम्या

‘शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीला २ लाख’


बंगळूर:विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एचडी कुमारस्वामी यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोमवारी एक लक्षवेधी घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या महिलांना आमच्या पक्षाकडून दोन लाख रुपये दिले जातील, असे त्यांनी कोलारमधील ‘पंचरत्न’ रॅलीला संबोधित करताना जाहीर केले.



“मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करायला तयार नाहीत, अशी एक याचिका माझ्याकडे आली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मुलींना दोन लाख रुपये द्यावेत. आमच्या मुलांच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाईल”, असे ते म्हणाले. कर्नाटकात एकाच टप्प्यात दि. १० मे रोजी मतदान होणार आहे. तर, दि. १३ मे रोजी निकाल जाहीर होतील.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button