ताज्या बातम्यादेश-विदेश

ब्रिटनमध्ये श्वेतवर्णीय युवतींवर बलात्कार करतात पाकिस्तानी


पाकिस्तानींनी जगभरात आपल्या विविध कृत्यांमुळे स्वत:ची आणि देशाची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.
ज्या देशात त्यांची संख्या फार मोठी आहे, अशा जवळपास प्रत्येक देशात त्यांच्या आचरण आणि समाजातील भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. ‘ब्रिटिश पाकिस्तानी गोर्‍या, श्वेतवर्णीय ब्रिटिश मुलींवर बलात्कार करतात, असे ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी Suella Braverman अलिकडेच एका दूरचित्रवाणी मुलाखतीत सांगितले. त्यांच्या या खुलाशामुळे इंग्लड तसेच युरोपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



ब्रिटनच्या गृहमंत्री Suella Braverman सुएला ब्रेव्हरमन यांची ही टिप्पणी अत्यंत गंभीर मानली जात आहे. खरे तर, बि’टन अशा अनेक घटनांचा साक्षीदार आहे, ज्यात गोर्‍या ब्रिटिश मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांंमध्ये पाकिस्तानी लोक सर्वाधिक सहभागी असल्याचे आढळून आले आहे. बि’टिश पाकिस्तानी ब्रिटनमधील श्वेतवर्णीय मुलींवर बलात्कार करतात, त्यांना अंमली पदार्थ देतात, असे एका दूरचित्रवाणी मुलाखतीत सुएला यांनी सांगितले. मात्र, पाकिस्तानी लोकांचा समाज अशा गोष्टी सहजपणे पचवतो, एवढेच नव्हे तर, अशा गुन्ह्यांवर कोणतीही प्रतिकि’या व्यक्त करीत नाही, ही अतिशय दु:खाची आणि आश्चर्याची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.

ब्रिटिश पाकिस्तानी पुरुष एक गट तयार करून अशी कामे करतात की, ज्यामुळे श्वेतवर्णीय मुली सहज त्यांच्या जाळ्यात अडकतील. ते ब्रिटनमधील मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना अमली पदार्थांची सवय लावतात, त्यांच्यावर बलात्कार करतात. राज्यातील पोलिस यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्ते अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात, असे सुएला यांनी सांगितले. पाकिस्तानची ही दूषित विचारसरणी केवळ ब्रिटनच नव्हे तर, तुर्की आणि सौदी अरबलाही फार पूर्वीपासून माहीत आहे. तुर्कीमध्ये तर ‘पाकिस्तान्यांना हाकलून द्या’ अशी मोहीम राबविण्यात आली होती. गेल्या वर्षी लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली तेथील अनेक शहरांमध्ये सुमारे 5 हजार पाकिस्तानींना ताब्यात घेण्यात आले होते.

रॉच्या माजी प्रमुखांनी केले समर्थन

विशेष म्हणजे, भारतीय गुप्तचर एजन्सी रॉचे माजी प्रमुख असलेले विक्रम सूद यांनी सुएला यांच्या या आरोपांचे समर्थन केले आहे. विक्रम सूद यांनी अनेक मालिका ट्विट करून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या पाकिस्तानी लोकांच्या भीषण कृत्यांचा पर्दाफाश केला. एका वृत्तसंस्थेच्या पत्रकार स्मिता प्रकाश यांचे ट्विट सूद यांनी रिट्विट केले आणि त्यावर लिहिले आहे की, हे 1997 पासून इंग्लंडमध्ये होत आहे. नन-श्वेतवर्णीय मुलींवर बलात्काराच्या 1400 घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये पाकिस्तानी वंशाचे नागरिक आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button