Video पोरांनी बनविले चक्क विमान; हवेत उडवून दाखवताच लोक म्हणाले..

काही तरुणांनी जुगाडच्या माध्यमातून चक्क एक विमान बनवलं आहे. ते साधसुधं नाही तर चक्क हवेत उडणारं विमान आहे. याच विमानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुणांनी जुगाडपासून बनविले विमान👇👇👇👇
बिहार के लोगों में कमाल की प्रतिभा है! 👏🏽🛩️ pic.twitter.com/9q6SkF3ljE
— Ankit Kumar Avasthi (@kaankit) February 14, 2024
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुलं हातात विमान घेऊन दुचाकीवरून कुठेतरी जात आहेत. तरुणांच्या हातातील विमानाकडे आजूबाजूचे लोकही आश्चर्यकारक नजरेने पाहत आहेत. ज्यानं ज्यानं ते विमान पाहिलं तो प्रत्येक जण अवाक् झाला, काही वेळानं एका ठिकाणी पोहोचल्यानंतर तरुण विमान घेऊन बाईकवरून खाली उतरतात आणि रिमोटच्या साह्यानं विमान धावपट्टीवर चालवतात. काही वेळातच विमान आकाशात उडू लागतं. काही अंतर आकाशात घिरट्या घातल्यानंतर विमान पुन्हा जमिनीवर आणलं जातं. हे दृश्य पाहण्यासाठी गावातील लोक जमा झाले होते.
तरुणांच्या क्रिएटिव्हिटीचे अनेकांनी केले कौतुक
हा व्हिडीओ @kaankit नावाच्या युजरने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे. हा व्हिडीओ बिहारचा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे लोक बिहारच्या या मुलांच्या क्रिएटिव्हीटीचे खूप कौतुक करीत आहेत. अनेकांनी म्हटले की, बिहारच्या लोकांमध्ये अद्भुत क्रिएटिव्हीटी आहे. दरम्यान, अनेकांना तरुणांची ही क्रिएटिव्हीटी वा मेहनत फार आवडली आहे











