पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावं, डावीकडे की उजवीकडे?

विवाहित जोडप्यांना बहुतांश वेळेस असा प्रश्न पडतो की, पत्नीने तिच्या पतीच्या शेजारी कोणत्या बाजूला झोपावे, डावीकडे की उजवीकडे? काही लोक त्यांच्या सोयीनुसार बाजूची निवड करतात.
पण तुम्ही पतीच्या कोणत्या बाजूला झोपताय, यावरुन बऱ्याच गोष्टी समजतात असे रिलेशनशिप एक्सपर्ट्सचं म्हणणंय. याद्वारे तुमच्या नात्यातील भावना आणि तुमच्यातील ताळमेळ याबाबत माहिती समजू शकतात. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
रिलेशनशिप एक्सपर्टचं काय म्हणणंय?
NDTVशी बातचित करताना रिलेशनशिप एक्सपर्ट आणि मोटीव्हेशनल स्पीकर डॉक्टर संदीप कोचर यांनी सांगितलं की, वैज्ञानिकदृष्ट्या डाव्या कुशीवर झोपणे शरीरासाठी चांगले मानले जाते. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. पण आपण ज्या कुशीवर झोपतो ते केवळ आरामासाठीच नव्हे तर त्याद्वारे आपली मानसिक स्थिती आणि नातेसंबंधांची भावना देखील दर्शवते. डॉक्टर संदीप यांनी असंही म्हटलं की, बिछाना ही एक अशी जागा जेथे दोन व्यक्ती ऊर्जा शेअर करतात. डाव्या कुशीवर झोपणे शांतता आणि आराम मिळवून देणारे असेत तर उजव्या कुशीवर झोपणे म्हणजे नेतृत्व आणि सक्रियतेशी संबंधित असते.
कोणत्या कुशी झोपण्याचा काय अर्थ असतो?
रिलेशनशिप एक्सपर्टच्या माहितीनुसार, जर पत्नीला डाव्या कुशीवर झोपायला आवडत असेल तर ती तिची नात्यातील भावनिक ओढ आणि सुरक्षिततेची भावना दर्शवते, याचा अर्थ तिला तिच्या जोडीदारासोबत राहून शांतता मिळते.
जर एखाद्या महिलेला उजव्या कुशीवर झोपणे पसंत असेल तर हे तिच्यातील आत्मविश्वास आणि स्वतः निर्णय घेण्याची प्रवृत्ती दर्शवते. म्हणजे तिला नात्यामध्ये समानता आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी हव्या आहेत.
कोणत्या कुशीवर झोपणे सर्वात चांगलं ठरेल?
या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर कोचर म्हणाले की, तुम्हाला झोपण्यासाठी सर्वात सोयीस्कर वाटेल ती बाजू निवडा. अधूनमधून तुम्ही कुस बदलू शकता. झोपण्याच्या स्थितीपेक्षा एकत्र झोपणे जास्त महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, असंख्य संशोधनाद्वारे सिद्ध झालंय की जे जोडपे एकत्र झोपतात ते अधिक आनंदी आणि समाधानी असतात. रिलेशनशिप एक्सपर्टने असंही म्हटलंय की, झोपण्यापूर्वी तुमच्या जोडीदारासोबत दिवसभरात काय घडलं, याबाबत चर्चा करा आणि हसतमुखाने झोपा.
( लोकशाही न्युज 24 या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)











